Shree Ganpati Stotra | श्री गणपती स्तोत्र

Shree Ganpati Stotra | श्री गणपती स्तोत्र

Shree Ganpati Stotra (Marathi) | श्री गणपती स्तोत्र (मराठी)

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ॥१॥

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें ।
तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ॥२॥

पाचवे श्रीलंबोदर सहावे विकटनाव तें ।
सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ॥३॥

नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक ।
अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ॥४॥

देवनावे अशी बारा तीनसंध्या म्हणे नर ।
विघ्नाभिती नसे त्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ॥५॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रर्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ॥६॥

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ ।
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ॥७॥

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे ।
श्रीधाराने मराठीत पठण्या अनुवादिले ॥८॥

(PDF) Download Shree Ganpati Stotra (Marathi) | श्री गणपती स्तोत्र (मराठी)

वरील DOWNLOAD लिंक वरून श्री गणपती स्तोत्र PDF रूपात डाउनलोड करू शकता.

श्री गणपती स्तोत्र आणि उपासने विषयी पुस्तके ऍमेझॉन (Amazon) वर उपलब्ध आहेत.

Shree Ganpati Stotra (Marathi) | श्री गणपती स्तोत्र (मराठी)

श्री राम रक्षा स्तोत्र वाचण्यासाठी Shree Ram Raksha Stotra | श्री राम रक्षा स्तोत्र येथे क्लिक करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा