Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

धांव पाव रे गोविंदा । हातीं घेवोनियां गदा ।
करी माझ्या कर्माचा चेंदा । सच्चिदानंदा श्रीहरी ॥ ३७ ॥

तुझिया नामाची अपरिमित शक्ती । तेथें माझी पापें किती ।
कृपाळुवा लक्ष्मीपती । बरवें चित्ती विचारीं ॥ ३८ ॥

तुझें नाम पतितपावन । तुझें नाम कलिमलदहन ।
तुझें नाम भवतारण । संकटनाशन नाम तुझें ॥ ३९ ॥

आता प्रार्थना ऐका कमळापती । तुझे नामी राहो माझी मती ।
हेंचि मागतों पुढतपुढतीं । परंज्योती व्यंकटेशा ॥ ४० ॥

तूं अनंत तुझीं अनंत नामें । तयांमाजी अति सुगमें ।
तीं मी अल्पमति सप्रेमें । स्मरुनि प्रार्थना करीतसें ॥ ४१ ॥

श्रीव्यंकटेशा वासुदेवा । प्रद्युम्ना अनंता केशवा ।
संकर्षणा श्रीधरा माधवा । नारायणा आदिमूर्ती ॥ ४२ ॥

पद्मनाभा दामोदरा । प्रकाशगहना परात्परा ।
आदि अनादि विश्र्वंभरा । जगदुद्धारा जगदीशा ॥ ४३ ॥

कृष्णा विष्णो हृषीकेशा । अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा ।
नृसिंह वामन भार्गवेशा । बौद्ध कलंकी निजमूर्ती ॥ ४४ ॥

अनाथरक्षका आदीपुरुषा । पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा ।
सकळमंगळ मंगळाधीशा । सज्जनजीवना सुखमूर्ती ॥ ४५ ॥

गुणातीता गुणाज्ञा । निजबोधरुपा निमग्ना ।
शुद्ध सात्त्विका सूज्ञा । गुणप्राज्ञा परमेश्र्वरा ॥ ४६ ॥

श्रीनिधि श्रीवत्सलांच्छनधरा । भयकृद्भयानाशना गिरिधरा ।
दुष्टदैत्यसंहारकरा । वीरा सुखकरा तूं एक ॥ ४७ ॥

निखिल निरंजन निर्विकारा । विवेकखाणीवैरागवरा ।
मधुमुरदैत्यसंहारकरा । असुरमर्दना उग्रमूर्ती ॥ ४८ ॥

शंखचक्रगदाधरा । गरुडवाहना भक्तप्रियकरा।
गोपीमनरंजना सुखकरा । अखंडित स्वभावें ॥ ४९ ॥

नानानाटकसूत्रधारिया । जगद्व्यापका जगद्वर्या ।
कृपासमुद्रा करुणालया । मुनिजनध्येया मूळमूर्ती ॥ ५० ॥

शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरुपमा ।
भक्तकैवारिया गुणधामा । पाव आम्हा ये समयीं ॥ ५१ ॥

ऐसी प्रार्थना करुनि देवीदास । अंतरी आठविला श्रीव्यंकटेश ।
स्मरतां हृदयीं प्रगटला ईश । त्या सुखासी पार नाही ॥ ५२ ॥

हृदयीं आविर्भवली मूर्ती । त्या सुखाची अलोलिक स्थिती ।
आपुले आपण श्रीपती । वाचे हाती बोलवीतसे ॥ ५३ ॥

तें स्वरुप अत्यंत सुंदर । श्रोतीं श्रवण कीजे सादर ।
सांवळी तनु सुकुमार । कुंकुमाकार पादपद्में ॥ ५४ ॥

सुरेख सरळ अंगोळिका । नखें जैसी चंद्ररेखा ।
घोटींव सुनीळ अपूर्व देखा । इंद्रनीळाचिये परी ॥ ५५ ॥

चरणीं वाळे घागरिया । वांकी वरत्या गुजरिया ।
सरळ सुंदर पोटरिया । कर्दळीस्तंभाचियेपरी ॥ ५६ ॥

गुडघे मांडिया जानुस्थळ । कटितटीं किंकिणी विशाळ ।
खालतें विश्र्वउत्पत्तिस्थळ । वरी झळाळी सोनसळा ॥ ५७ ॥

कटीवरतें नाभिस्थान । जेथोनि ब्रह्मा झाला उत्पन्न ।
उदरीं त्रिवळी शोभे गहन । त्रैलोक्य संपूर्ण जयामाजीं ॥ ५८ ॥

वक्षःस्थळीं शोभे पदक । पाहोनि चंद्रमा अधोमुख ।
वैजयंती करी लखलख । विद्युल्लतेचियेपरी ॥ ५९ ॥

हृदयीं श्रीवत्सलांछन । भूषण मिरवी श्रीभगवान ।
तयावरते कंठस्थान । जयासी मुनिगण अवलोकिती ॥ ६० ॥

उभय बाहुदंड सरळ । नखें चंद्रापरीस तेजाळ ।
शोभती दोन्ही करकमळ । रातोत्पलाचियेपरी ॥ ६१ ॥

मनगटी विराजती कंकणे । बाहुवटीं बाहुभूषणें ।
कंठी लेइली आभरणे। सूर्यकिरणे उगवली ॥ ६२ ॥

कंठावरुते मुखकमळ । हनुवटी अत्यंत सुनीळ ।
मुखचंद्रमा अति निर्मळ । भक्तस्नेहाळ गोविंदा ॥ ६३ ॥

दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती । जिव्हा जैसी लावण्यज्योति ।
अधरामृतप्राप्तीची गती । जाणे लक्ष्मी ते सुख ॥ ६४ ॥

सरळ सुंदर नासिक । जेथे पवनासी झाले सुख ।
गंडस्थळींचे तेज अधिक । लखलखित दोहीं भागीं ॥ ६५ ॥

त्रिभुवनीचे तेज एकवटले । बरवेपण सिगेसी आले ।
दोहीं पातयांनी धरिले । तेच नेत्र श्रीहरीचे ॥ ६६ ॥

व्यंकटा भृकुटिया सुनिळा । कर्णद्वयाची अभिनव लीळा ।
कुंडलांच्या फांकती कळा । तो सुखसोहळा अलोलिक ॥ ६७ ॥

भाळ विशाळ सुरेख । वरती शोभे कस्तुरीटिळक ।
केश कुरळे अलोलिक । मस्तकावरी शोभती ॥ ६८ ॥

मस्तकी मुगुट आणि किरीटी । सभोवती झिळमिळ्यांची दाटी ।
त्यावरी मयूरपिच्छांची वेठी । ऐसा जगजेठी देखिला ॥ ६९ ॥

ऐसा तू देवाधिदेव । गुणातीत वासुदेव ।
माझिया भक्तीस्तव । सगुणरुप झालासी ॥ ७० ॥

आतां करु तुझी पूजा । जगज्जीवना अधोक्षजा ।
आर्ष भावार्थ हा माझा । तुज अर्पण केला असे ॥ ७१ ॥

करुनि पंचामृतस्नान । शुद्धामृत वरी घालून ।
तुज करुं मंगलस्नान । पुरुषसूक्तें करुनियां ॥ ७२ ॥

READ  Shree Hanuman Chalisa | श्री हनुमान चालीसा
(PDF) Download Shree Vyankatesh Stotra | डाउनलोड श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री मनाचे श्लोक वाचण्यासाठी Shree Manache Shlok येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment