Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

वस्त्रें आणि यज्ञोपवित । तुजलागीं करुं प्रीत्यर्थ ।
गंधाक्षता पुष्पें बहुत । तुजलागी समर्पू ॥ ७३ ॥

धूप दीप नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध ।
वस्त्रें भूषणें गोमेद । पद्मरागादि करुनि ॥ ७४ ॥

भक्तवत्सला गोविंदा । ही पूजा अंगीकारावी परमानंदा ।
नमस्कारुनि पादारविंदा । मग प्रदक्षिणा आरंभिली ॥ ७५ ॥

ऐसा षोडषोपचारे भगवंत । यथाविधी पूजिला हृदयांत ।
मग प्रार्थना आरंभिली बहुत । वर प्रसाद मागावया ॥ ७६ ॥

जयजयाजी श्रुतिशास्त्रआगमा । जयजयाजी गुणातीत परब्रह्मा ।
जयजयाजी हृदयवासिया रामा । जगदुद्धारा जगद्गुरु ॥ ७७ ॥

जयजयाजी पंकजाक्षा । जयजयाजी कमळाधीशा ।
जयजयाजी पूर्णपरेशा । अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ती ॥ ७८ ॥

जयजयाजी भक्तरक्षका । जयजयाजी वैुकुंठनायका ।
जयजयाजी जगपालका । भक्तांसी सखा तू एक ॥ ७९ ॥

जयजयाजी निरंजना । जयजयाजी परात्परगहना ।
जयजयाजी शून्यातितनिर्गुणा । परिसावी विज्ञापना एक माझी ॥ ८० ॥

मजलागी देई ऐसा वर । जेणें घडेल परोपकार ।
हेंचि मागणें साचार । वारंवार प्रार्थितसें ॥ ८१ ॥

हा ग्रंथ जो पठण करी । त्यासी दुःख नसावें संसारी ।
पठणमात्रें चराचरी । विजयी करी जगाते ॥ ८२ ॥

लग्नार्थियाचे व्हावे लग्न । धनार्थियासी व्हावें धन ।
पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण । पुत्र देऊनि करावे ॥ ८३ ॥

पुत्र विजयी आणि पंडित । शतायुषी भाग्यवंत ।
पितृसेवेसी अत्यंत रत । जयाचें चित्त सर्वकाळ ॥ ८४ ॥

उदार आणि सर्वज्ञ । पुत्र देई भक्तालागून ।
व्याधिष्टाची पीडा हरण । तत्काळ कीजे गोविंदा ॥ ८५ ॥

क्षय अपस्मार कुष्ठादि रोग । ग्रंथपठणें सरावा भोग ।
योगाबह्यासियासी योग । पठणमात्रे साधावा ॥ ८६ ॥

दरिद्री व्हावा भाग्यवंत । शत्रूचा व्हावा निःपात ।
सभा व्हावी वश समस्त । ग्रंथपठणें करुनियां ॥ ८७ ॥

विद्यार्थियासी विद्या व्हावी । युद्धीं शस्त्रें न लागावीं ।
पठणें जगांत कीर्ती व्हावी । साधु साधु म्हणोनियां ॥ ८८ ॥

अंती व्हावे मोक्षसाधन । ऐसें प्रार्थनेसी दीजे मन ।
एवढे मागतों वरदान । कृपानिधे गोविंदा ॥ ८९ ॥

प्रसन्न झाला व्यंकटरमण । देवीदासासी दिधलें वरदान ।
ग्रंथाक्षरी माझें वचन । यथार्थ जाण निश्र्चयेंसीं ॥ ९० ॥

ग्रंथी धरोनि विश्र्वास । पठण करील रात्रंदिवस ।
त्यालागी मी जगदीश । क्षण एक न विसंबे ॥ ९१ ॥

इच्छा धरुनि करील पठण । त्याचें सांगतों मी प्रमाण ।
सर्व कामनेसी साधन । पठण एक मंडळ ॥ ९२ ॥

पुत्रार्थियाने तीन मास । धनार्थियानें एकवीस दिवस ।
कन्यार्थियानें षणमास । ग्रंथ आदरें वाचावा ॥ ९३ ॥

क्षय अपस्मार कुष्ठादि रोग । इत्यादि साधनें प्रयोग ।
त्यासी एक मंडळ सांग । पठणे करुनि कार्यसिद्धी ॥ ९४ ॥

हें वाक्य माझे नेमस्त । ऐसें बोलिला श्रीभगवंत ।
साच न मानी जयाचें चित्त । त्यासी अधःपात सत्य होय ॥ ९५ ॥

विश्र्वास धरील ग्रंथपठणीं । त्यासी कृपा करील चक्रपाणी ।
वर दिधला कृपा करुनी । अनुभवें कळों येईल ॥ ९६ ॥

गजेंद्राचिया आकांतासी । कैसा पावला हृषीकेशी ।
प्रल्हादाचिया भावार्थासी । स्तंभातूनि प्रगटला ॥ ९७ ॥

वज्रासाठी गोविंदा । गोवर्धन परमानंदा ।
उचलोनियां स्वानंदकंदा । सुखी केलें तये वेळीं ॥ ९८ ॥

वत्साचे परी भक्तासी । मोहे पान्हावे धेनु जैसी ।
मातेच्या स्नेहतुलनेसी । त्याचपरी घडलेसे ॥ ९९ ॥

ऐसा तूं माझा दातार । भक्तासी घालिसी कृपेची पाखर ।
हा तयाचा निर्धार । अनाथनाथ नाम तुझें ॥ १०० ॥

श्रीचैतन्यकृपा अलोलिक । तोषोनिया वैकुंठनायक ।
वर दिधला अलोकिक । जेणें सुख सकळांसी ॥ १०१ ॥

हा ग्रंथ लिहिता गोविंद । या वचनीं न धरावा भेद ।
हृदयीं वसे परमानंद । अनुभवसिद्धी सकळांसी ॥ १०२ ॥

या ग्रंथीचा इतिहास । भावें बोलिला विष्णुदास ।
आणिक न लागती सायास । पठणमात्रे कार्यसिद्धी ॥ १०३ ॥

पार्वतीस उपदेशी कैलासनायक । पूर्णानंद प्रेमसुख ।
त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक । मुनि सुरवर विस्मित ॥ १०४ ॥

प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी । त्रैलोक्य भजत त्रिकाळी ।
ध्याती योगी आणि चंद्रमौळी । शेषाद्रिपर्वतीं उभा असे ॥ १०५ ॥

देवीदास विनवी श्रोतयां चतुरां । प्रार्थनाशतक पठण करा ।
जावया मोक्षाचिया मंदिरा । कांही न लागती सायास ॥ १०६ ॥

एकाग्रचित्ते एकांतीं । अनुष्ठान कीजे मध्यरातीं ।
बैसोनिया स्वस्थचित्तीं । प्रत्यक्ष मूर्ति प्रगटेल ॥ १०७ ॥

तेजें देहभावासी नुरे ठाव । अवघा चतुर्भुज देव ।
त्याचे चरणीं ठेवोनियां भाव । वरप्रसाद मागावा ॥ १०८ ॥

॥ इति श्रीदेवीदासविरचितं श्रीव्यंकटेशस्तोत्रं संपूर्णम् ॥

(PDF) Download Shree Vyankatesh Stotra | डाउनलोड श्री व्यंकटेश स्तोत्र

संस्कृत वेंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी Venkatesh Stotra येथे क्लिक करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा