Suvichar Marathi | सुविचार मराठी

आजचा सुविचार
09.10.2024

जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते,
फक्त आपल्या मनामध्ये निस्वार्थ भावना आणि साफ नीती पाहिजे.


Suvichar Marathi | सुविचार मराठी

अपयश हीच यशाची पहिली पायरी असते.

जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

राजाप्रमाणे जीवन जगण्यासाठी
आधी गुलामाप्रमाणे मेहनत करावी लागते.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

मुलांना भेटवस्तू दिल्या नाहीत तर ते काही काळ रडतात,
पण जर त्यांना सुसंस्कार दिले नाहीत तर ते आयुष्यभर रडतात.

ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला,
कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात.

क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो,
आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.

गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.

या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

Leave a Comment