Shri Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

॥ श्री स्वामी समर्थ ॥

नि: शंक हो निर्भय हो मना रे ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥

जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय ।
स्वये भक्त – प्रारब्ध घडवी हि माय ॥
आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला ।
परलोकीही ना भीती तयाला ॥२॥

उगाची भितोसी भय हें पळू दे ।
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ॥
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ॥३॥

खरा होई जागा श्रद्धेसहीत ।
कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ॥
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू स्वामी देतील साथ ॥४॥

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।
स्वामीच या पंच प्राणामृतात ॥
हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति ।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥५॥

॥ श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ॥

(PDF) Download Shri Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

स्वामी समर्थ तारकमंत्र - अजीत कडकडे || SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video) - AJEET KADKADE
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

घोरकष्टोद्धरण स्तोत्र वाचण्यासाठी Ghorkashtodharan Stotra येथे क्लिक करा.
आदित्य हृदय स्तोत्र Aditya Hridaya Stotra | आदित्य हृदय स्तोत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
श्री हनुमान वडवानल स्तोत्र वाचण्यासाठी Shri Hanuman Vadvanal Stotra येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link