प्रत्येकाच्या जीवनात विविध प्रकारचे अडथळे, अडचणी आणि संकटे येत असतात. या संकटांवर मात करून जीवन आनंदी करण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी अनेक प्रभावी स्तोत्रांची रचना केली आहे. या स्तोत्रांचे महत्त्व आपल्याला जीवन सुखकर झाल्यावर अधिक जाणवते. त्यापैकीच एक म्हणजे घोरकष्टोद्धरण स्तोत्र.
प्रस्तावना (Introduction)
प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (श्री टेंब्येस्वामी) यांनी या स्तोत्राची रचना केली आहे. स्वामीजींनी हे स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ यांना समर्पित केले आहे, जे भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार आहेत. जो व्यक्ती दररोज या पाच श्लोकांचे पठण करतो तो भगवान दत्तात्रेयांना खूप प्रिय होतो.
हे स्तोत्र भक्तिभावाने पठण केल्यास संकटांवर विजय मिळविण्याचे अद्भुत सामर्थ्य प्राप्त होते. विशेषतः गुरुवारी किंवा एखाद्या शुभ दिवशी या स्तोत्राचे अकरा वेळा मनोभावे पठण केल्यास, येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची ऊर्जा आणि कृपा प्राप्त होते. या स्तोत्राच्या नियमित पठणाने जीवनातील विविध संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे.

घोरकष्टोद्धरण स्तोत्र संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरूग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्र आहे.
या स्तोत्रात एकूण ५ श्लोक आहेत जे मनुष्याच्या सर्व समस्या, वेदना, रोग, रोग, दारिद्र्य, पाप इत्यादी दूर करण्यास सक्षम आहेत. हे स्तोत्र दररोज ११ वेळा पाठ करावे. शक्य असल्यास गुरुवारी १०८ वेळा स्तोत्राचे पठण करावे.
कोणत्याही प्रकारचा ग्रहदुष्ट असेल आणि विशेषत: जर तुमच्या कुंडलीत गुरू ग्रह दुर्बल असेल किंवा तुम्हाला गुरूच्या महादशेमध्ये त्रास होत असेल किंवा अष्टम गुरूचे संक्रमण असेल तर या स्तोत्राचा पाठ अवश्य करावा. लग्नाला उशीर झाला तर या स्तोत्राचे पूर्ण भक्तिभावाने पठण करावे.
घोरकष्टोद्धारण स्तोत्र (Ghorkashtodharan Stotra)
॥ घोरकष्टोद्धरण स्तोत्र ॥
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
॥ श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥
॥ प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥
॥ इति श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम् संपूर्णम ॥
॥ श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ॥
(PDF) Download घोरकष्टोद्धारण स्तोत्र
घोरकष्टोद्धारण स्तोत्राचा अर्थ (Meaning of Ghorkashtodharan Stotra)
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
हे प. पू. प. प. श्रीपाद श्रीवल्लभा, देवाधीदेवा, ‘मी’ आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात (ग्राह्य मानून) घेऊन, आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
हे प्रभो, विश्वमूर्ते, माझे माता-पिता-बांधव-त्राता आपणच आहात. आपणच सर्वाचे ‘योग-क्षेम’ पहाता. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररुपी-भवसागररुपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो.
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
आपण आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा पापयुक्त त्रिविधतापातून माझी सुटका करावी. माझ्या शारिरीक-मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीति इ. क्लेश दूर करावेत आणि या घोर-कलीकाळापासून या घोरसंकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो.
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ ‘त्राता’ नाही. आपणासम दानशूर ‘दाता’ ही नाही. आपणासम भरण-पोषण करणारा ‘भर्ता’ ही नाही. हे आपण लक्षात घेऊन, हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणार्या देवाधिदेवा, आपण माझा या ‘घोर’ संकटातून, माझ्यावर ‘पुर्ण-अनुग्रह’ करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
“धर्मे प्रीतीम सन्मतिं” सर्व प्रकारच्या कष्टातून, हे प्रभो, तू मला सोडव. त्या सगळ्यातून का सोडव, तर मला “धर्मा बद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी (वरील कष्ट दूर झाल्या नंतर) उत्पन्न होण्यास मदत होईल आणि तुझ्याबद्दलचा (पूज्य) भाव प्राप्त होईल. म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव. पहिल्या ४ श्लोकांमध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत, पण खरे इंगित म्हणजे व्यावहारिक कष्टातून सुटका झाल्याशिवाय सर्वसामान्य माणूस परमार्थात नीट लक्ष घालू शकणार नाही.
॥ श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥
॥ प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥
वरील पाच श्लोक लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत. तसेच, जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्ती ने पठाण करेल, तो श्रीदत्ता ला प्रिय होईल.
आदित्य हृदय स्तोत्र Aditya Hridaya Stotra | आदित्य हृदय स्तोत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
घोरकष्टोद्धारण स्तोत्राची पार्श्वभूमी (Story Behind Ghorkashtodharan Stotra )
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१ वा चातुर्मास शके १८३३ (इ. स. १९११) कुरुगड्डी (कुरवपूर) येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते.
त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्रीास्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. “आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसर्या कोणाजवळ सांगावयाची?”, असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामीमहाराजांच्या कानावर घातल्या.
स्वामीमहाराजांनी श्री. शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले. शेषो कारदगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना वेंकटरमणचे पद करून दिले होते.
या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी रहावेत आणी सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री. शेषो कारदगेकर यांनी श्री स्वामीमहाराजांना अशी प्रार्थना केली की, “माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपादश्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे”. शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी “घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र” रचून त्यांना दिले.
श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हंटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काहीजण तर याचा १०८ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे ऐहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे. खरोखर श्री शेषो कारदगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे.

घोरकष्टोद्धारण स्तोत्राचे फायदे (Benefits of Ghorkashtodharan Stotra)
- घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे नियमित पठण करूनही मोठ्या समस्या सोडवता येतात.
- घोरकष्टोद्धरण स्तोत्राच्या जपाने दुःख, रोग, आजार, दारिद्र्य, पाप इत्यादी दूर होतात.
- ज्या पती-पत्नींना संतती हवी आहे, त्यांनीही या स्तोत्राचे पठण करावे.
- श्लोकाचे नियमित पठण करणारी व्यक्ती भगवान दत्तात्रेयांना अतिशय प्रिय असते.
- घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा पूर्ण भक्तीभावाने पाठ केल्यास भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात.
- गुरुच्या महादशेमध्ये दर गुरुवारी ११ वेळा घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण करावे.
- आठवा गुरु संक्रमणात असतानाही घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे नियमित पठण करावे.
श्री मारुती स्तोत्र वाचण्यासाठी Shree Maruti Stotra | श्री मारुती स्तोत्र येथे क्लिक करा.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र वाचण्यासाठी Shri Swami Tarak Mantra येथे क्लिक करा.