श्री गजानन विजय ग्रंथ हा श्री गजानन महाराजांच्या चरित्रावर आधारित एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. दासगणू महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ २१ अध्यायांमध्ये विभागलेला असून त्यात श्री गजानन महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र वर्णिलेले आहे.
ग्रंथाची रचना आणि महत्त्व
श्री गजानन महाराजांच्या समाधीनंतर त्यांचे परमभक्त श्री दासगणू महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ओवी छंदात श्री गजानन महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांची शिकवण आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचे सविस्तर वर्णन आहे. प्रत्येक अध्याय हा एक स्वतंत्र कथाभाग असून त्यातून श्री गजानन महाराजांच्या दिव्य व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रकट होतात.
ग्रंथातील महत्त्वाचे प्रसंग
ग्रंथामध्ये अनेक महत्त्वाचे प्रसंग वर्णिलेले आहेत:
- श्री गजानन महाराजांचे शेगावी आगमन आणि त्यांची प्रथम भेट
- बंकटलाल कापडीला दिलेला अनुभव
- पटेल यांच्या घरी झालेला चमत्कार
- देवीदास यांना दिलेला साक्षात्कार

श्री सत्यनारायण पूजा संपूर्ण माहिती वाचण्यासाठी Shri Satyanarayan Pooja | श्री सत्यनारायण पूजा येथे क्लिक करा
ग्रंथाचे वैशिष्ट्य
या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सोपी आणि सरळ भाषा. दासगणू महाराजांनी वापरलेली मराठी भाषा सर्वसामान्य भाविकांना सहज समजेल अशी आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना कोणत्याही वाचकाला अडथळा येत नाही.
आध्यात्मिक महत्त्व
श्री गजानन विजय ग्रंथ हा केवळ एक चरित्रग्रंथ नाही तर तो एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. या ग्रंथातून आपल्याला खालील महत्त्वाचे संदेश मिळतात:
- ईश्वरावरील दृढ श्रद्धा
- सर्व धर्मांविषयी आदर
- सेवाभाव आणि परोपकार
- साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
पारायण महत्त्व
बरेच भाविक या ग्रंथाचे नियमित पारायण करतात. असे मानले जाते की या ग्रंथाच्या पारायणाने मनःशांती मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. विशेषतः संकटकाळात या ग्रंथाचे पारायण करण्याची प्रथा आहे.
श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार
एकआसनी पारायण
एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्याच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.
एकदिवसीय पारायण
एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बर्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात ते एकदिवसीय पारायण.
जागतिक पारायणदिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे. वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो.
सप्ताह पारायण
सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केले जाते. महाराजांचा प्रकटदिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो.
तिन दिवसिय पारायण
तिन दिवस दररोज ७ अध्याय (किंवा ९, ७ व ५ अध्याय) वाचून हे पारायण केले जाते. दशमी, एकादशी व द्वादशी च्या निमित्ताने केलेल्या तिन दिवसीय पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे. मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो.
गुरुवारचे पारायण
गुरुवार हा महाराजांचा शुभदिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व २१ गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते. असा द्विगुणीत लाभ मिळतो.
एका ग्रुप मध्ये एकविस भक्तच भाग घेऊ शकतात. हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही.
चक्री पारायण किंवा २१ दिवसीय पारायण
खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय (पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा, एकविसाव्या दिवशी सर्वांनी २१ वा अध्याय वाचणे) वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे.
साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा उपासना करतात. यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
संकीर्तन पारायण
एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप असावे. ही एक श्रवण भक्ति आहे. गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे.
व्यासपीठावर बसून जेंव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.
सामुहिक पारायण
एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होते.
समारोप
श्री गजानन विजय ग्रंथ हा महाराष्ट्राच्या भक्तिसाहित्यातील एक अमूल्य ठेवा आहे. या ग्रंथाने गेल्या अनेक वर्षांपासून लाखो भाविकांच्या जीवनात प्रकाश पाडला आहे. आजही हा ग्रंथ तितकाच प्रासंगिक आहे आणि नव्या पिढीलाही मार्गदर्शन करत आहे.
जय गजानन!
श्री गजानन विजय ग्रंथ २१ अध्याय (Shri Gajanan Vijay Granth)
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय पहिला
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय दुसरा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय तिसरा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय चौथा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय पाचवा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय सहावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय सातवा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय आठवा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय नऊवा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय दहावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय अकरावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय बारावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय तेरावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय चौदावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय पंधरावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय सोळावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय सतरावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय अठरावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय एकोणिसावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय विसावा
- श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय एकविसावा
श्री गुरुचरित्र संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
गण गण गणात बोते!