Shiv Tandav Stotra | शिव तांडव स्तोत्र

शिव तांडव स्तोत्र (Shiv Tandav Stotra) हे भगवान शंकरांची (शिवांची) स्तुती करणारे स्तोत्र असून त्यात भगवान शिवांची शक्ती आणि सौंदर्याचे वर्णन आहे. शिव तांडव स्तोत्र हे विद्वान आणि शिवांचे परम भक्त लंकाधिपती रावण यांनी रचले आहे.

0 Comments

Annapurna Stotra | अन्नपूर्णा स्तोत्र

श्री अन्नपूर्णा स्तोत्र (अष्टकाम) (Annapurna Stotra) हे अन्नपूर्णा देवीची स्तुती करणारे आणि देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करणारे स्तोत्र आहे. हे स्तोत्र ८ व्या शतकातील गुरु आदि शंकराचार्य यांनी लिहिले आहे. देवी अन्नपूर्णा ही हिंदू धर्मातील अन्न आणि पौष्टिकतेची देवी आहे. ती भगवान शिवांची पत्नी पार्वतीचे एक रूप आहे.

0 Comments

Shree Hanuman Chalisa | श्री हनुमान चालीसा

श्री हनुमान चालीसा (Shree Hanuman Chalisa) हे हनुमानावरील चाळीस चौपाई (श्लोक) म्हणजे भगवान हनुमानाला संबोधित केलेले हिंदू भक्ती स्तोत्र आहे. याचे लिखाण १६ व्या शतकातील संत कवी तुलसीदास यांनी अवधी भाषेत केले होते. तुलसीदास यांच्या लिखाण कार्यातील रामचरितमानास नंतरचे हे सर्वात प्रसिद्ध लिखाण कार्य आहे. "चालीसा" हा शब्द हिंदीतील चालीस वरून आला आहे, कारण हनुमान चालीसेमध्ये ४० श्लोक आहेत (सुरुवातीचे आणि शेवटचे दोहे वगळता).

1 Comment

Shree Ganpati Stotra | श्री गणपती स्तोत्र

श्री गणपती स्तोत्र (Shree Ganpati Stotra) हे संस्कृतमध्ये असून ते नारद मुनींच्या नारद पुराणातून घेतले आहे. या स्तोत्रात नारद मुनी श्री गणेशाच्या १२ नावांचा उल्लेख करत त्याच्या भव्यतेचे वर्णन करतात.

0 Comments

Shree Ram Raksha Stotra | श्री राम रक्षा स्तोत्र

श्री रामरक्षा स्तोत्र (Shree Ram Raksha Stotra) हे संस्कृत मध्ये असून, श्री रामाची स्तुती करणारे स्तोत्र आहे. हे श्रीरामाचे संरक्षण मिळविण्यासाठी प्रार्थना म्हणून म्हटले जाते.

0 Comments

Shree Maruti Stotra | श्री मारुती स्तोत्र

Shree Maruti Stotra - श्री मारुती स्तोत्र : समर्थ रामदास स्वामी हे १७ व्या शतकातील एक महान संत होते, त्यांनी मारुतीची (हनुमान) स्तुती करणारी ११ स्तोत्रे लिहिली आहेत. या स्तोत्रांमधे मारुतीच्या पराक्रमाचे आणि चरित्राचे वर्णन केले आहे.

0 Comments

Karunashtake | करुणाष्टके

करुणाष्टके (Karunashtake) ही समर्थ रामदास स्वामींच्या रचनांमधील एक काव्य रचना आहे. समर्थ रामदास हे प्रभू श्रीरामांचे भक्त असल्यामुळे त्यांनी करुणाष्टके ही प्रभू श्रीरामांना उद्देशून लिहिली आहेत. करुणाष्टके ही करुणरसात लिहिली असून प्रभू रामांना आळवणारी आहेत. भौतिक विश्व, सुखवस्तू, नातेसंबंध इत्यादी व्यर्थ आहे. या सर्व गोष्टी वास्तविक सुख, समाधान आणि शांतता देऊ शकत नाहीत. याची जाणीव झाल्यावर मनुष्य देवाला शरण जातो आणि चिरंतन शांती प्राप्त करतो.

0 Comments

Shree Manache Shlok | श्री मनाचे श्लोक

मन हे नेहमी सुखाच्या शोधात असतं. या सुखातून बरेचदा दुःख निर्माण होतं. चंचल व दुःखी मन सतत भटकत असतं. या मनाची भटकंती थांबवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश देणारे श्री मनाचे श्लोक (Shree Manache Shlok) लिहिले आहेत.

3 Comments