परिचय
Devisuktam: देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य (दुर्गासप्तशती) च्या ५ व्या अध्यायातील एक स्तोत्र आहे. देवीसूक्तम् संस्कृतमध्ये असून त्याला तंत्रोक्तदेवीसूक्तम् किंवा चंडीपाठ म्हणूनही ओळखले जाते. देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य च्या शेवटी वाचले जाते.
देवीसूक्तम् (Devisuktam) मध्ये देवीच्या रौद्र म्हणजेच चंडी किंवा दुर्गा रूपाचे वर्णन आणि गुणगान आहे. हे स्तोत्र खूप लोकप्रिय असून देवीच्या मंदिरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी म्हटले जाते. नवरात्री मध्ये देवीसूक्तम् चे विशेष पठण केले जाते.
देवीसूक्तम् (Devisuktam) स्तोत्राचा उगम:
वर सांगितल्याप्रमाणे देवीसूक्तम् हे देवीमहात्म्याच्या ५ व्या अध्यायात आहे. आधीच्या ४ अध्यायात देवी महिषासुर राक्षसाचा वध करते आणि देवांना आश्वासन देते की भविष्यातही त्यांना त्रास झाला तर ती त्यांना मदत करेल.
काही काळानंतर, दोन राक्षस बंधू, शुंभ आणि निशुंभ तिन्ही लोकांत दहशत माजवतात. सूर्य, कुबेर, यम, वरुण, अग्नि, वायू आणि इतर देवतांना ताब्यात घेतात आणि त्यांच्या जागी स्वत: ला स्थापित करतात. देवतांचा पराभव होतो आणि त्यांना त्यांचे सामर्थ्य, अधिकार आणि सन्मान गमवावे लागतात. सर्व अधिकार, सन्मान आणि सामर्थ्य गेल्यानंतर, देवांना त्यांच्या त्रासातून सोडवण्याचे देवीने दिलेले आश्वासन आठवते. मग सर्व देवता हिमालयात पोहोचतात आणि मदतीसाठी देवीची प्रार्थना करतात. हीच स्तुतीपर प्रार्थना देवीसूक्तम् (Devisuktam) या नावाने ओळखली जाते.
असे म्हणतात की देवीसूक्तम् चा जप केल्याने माणसाच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतात.
Devisuktam | देवीसूक्तम्
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥१॥
रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ।
ज्योत्स्ना यै चेन्दुरुपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥
कल्याण्यै प्रणतां वृध्दै सिध्दयै कुर्मो नमो नमः ।
नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यातै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शाध्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥६॥
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥७॥
या देवी सर्वभूतेषु बुध्दिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥८॥
या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥९॥
या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१०॥
या देवी सर्वभूतेषु छायारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥११॥
या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१२॥
या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१३॥
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१४॥
या देवी सर्वभूतेषु जातिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१५॥
या देवी सर्वभूतेषु लज्जारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१६॥
या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१७॥
या देवी सर्वभूतेषु श्रध्दारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१८॥
या देवी सर्वभूतेषु कान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१९॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२०॥
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२१॥
या देवी सर्वभूतेषु स्मृतिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२२॥
या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२३॥
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२४॥
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२५॥
या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२६॥
इंद्रियाणामधिष्ठात्री भूतानं चाखिलेषु या ।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः ॥२७॥
चितिरुपेण या कृत्सनमेद्वयाप्य स्थिता जगत् ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२८॥
स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता ।
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्याभिहन्तु चापदः ॥२९॥
या सांप्रतं चोध्दतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।
या च तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्ति विनम्रमूर्तिभिः ॥३०॥
॥ इति देवीसूक्तम् समाप्तम् ॥
(PDF) Download Devisuktam | डाउनलोड देवीसूक्तम्
नवग्रह स्तोत्र वाचण्यासाठी Navagrah Stotra येथे क्लिक करा.
श्री शिवस्तुति वाचण्यासाठी Shree Shiv Stuti येथे क्लिक करा.
महालक्ष्मी अष्टक वाचण्यासाठी Mahalakshmi Ashtak येथे क्लिक करा.