Shree Shiv Stuti | श्री शिवस्तुति

Shree Shiv Stuti: ही श्री शिवस्तुति मराठी मध्ये असून यात एकूण ३१ श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकामध्ये भगवान शंकरांची (शिवांची) स्तुती करत – त्यांच्या रूपाचे, परिधानाचे, शस्त्रांचे, त्यांच्या योगमुद्रेचे, इत्यादींचे – वर्णन कले आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट हा – “तुजवीण शंभो मज कोण तारी” म्हणजे देवा, तूच आमचा तारणहार आहेस – ने झालेला आहे.

अन्नपूर्णा स्तोत्र वाचण्यासाठी Annapurna Stotra  येथे क्लिक करा.

ज्याच्या पतित पावन स्मरणाने दुःखाचा भवसिंधु पार होतो, अशा भगवान शिवाची कास सोडू नको. त्यांची मनोभावे भक्ती केली असता काळाचे भय बाळगण्याची, तप, व्रत – वैकल्य, योगाभ्यास, शास्त्राभ्यास करण्याची, आणि देवाच्या शोधार्थ तीर्थाटन करण्याची काहीही गरज नाही. असे श्री शिवस्तुति (Shree Shiv Stuti) च्याशेवटच्या श्लोकात म्हटले आहे.

shiv stuti image

Shree Shiv Stuti | श्री शिवस्तुति

कैलासराणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १

रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी ।
ब्रम्हांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥

जटा विभूती उटी चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्र्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमाविलासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥

उदार मेरू पति शैलजेचा । श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥

ब्रम्हादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥

कर्पूरगौरी गिऱिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदु:खें स्मरणे निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे । तो देवचुडामणि कोण आहे ।
उदासमुर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥

नंदी हराचा हरि नंदिकेश । श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥

भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदे करि काम भग्न ।
तो रुद्र विश्र्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥

इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी सुची तो करि ब्रम्हगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥

भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रम्हामंत्र ।
विश्र्वेश विश्र्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥

सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशिकोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥

कर्पूरगौरी स्मरल्या विसावा । चिंता हरी जो भजका सदैवा ।
अंती स्वहीत सूचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥

विरामकाळी विकळ शरीर । उदास चित्ती न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतने चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥

सुखवसानें सकळे सुखाची । दु:खवसाने टळती जगाची ।
देहावसानी धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥

अनुहत शब्द गगनीं न माय । त्याचेनि नादे भाव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥

शांति स्वलीला वदनी विलासे । ब्रम्हांडगोळी असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥

पितांबरे मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीचि ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥

जिवा-शिवाची जडली समाधी । विटला प्रपंची तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥

निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥

मंदार बिल्वे बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्र्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥

जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळा मालतिमाळ हाती ।
प्रतापसूर्यशरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनी विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतीरी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥

नागेशनामा सकळा झिव्हाळा । मना जपे रें शिमंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥

एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरुपी शिव सौख्य नामी ।
शिणलो दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥

शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासि जाऊ नको ।
योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको ।
काळाचे भय मानसी धरू नको दृष्टास शंकू नको ।
ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥ ३१ ॥

READ  Shri Saraswati Stotram | श्री सरस्वती स्तोत्र
(PDF) Download Shree Shiv Stuti | डाउनलोड श्री शिवस्तुति

श्री रुद्राष्टकम् वाचण्यासाठी Rudrashtakam येथे क्लिक करा.

Shri Shivstuti | Marathi Devotional | Pandit Ajit Kadkade
Shree Shiv Stuti | श्री शिवस्तुति

श्री व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी Shree Vyankatesh Stotra येथे क्लिक करा.
समर्थ रामदास लिखित करुणाष्टके वाचण्यासाठी Karunashtake येथे क्लिक करा.

श्री कालभैरव स्तोत्र वाचण्यासाठी Shri Kalbhairav Stotra येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link