Mahalakshmi Ashtak | श्री महालक्ष्मी अष्टक

परिचय

Mahalakshmi Ashtak: श्री महालक्ष्मी अष्टक ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. श्री महालक्ष्मी अष्टक पद्म पुराणातून घेतले गेले आहे. ही प्रार्थना इंद्रदेवांनी महालक्ष्मी च्या स्तुतीसाठी केली आहे.

हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवी पूजनीय आहेत. देवी लक्ष्मी या समृद्धी आणि संपत्ती च्या देवता आहेत. देवी लक्ष्मी या भगवान विष्णूंच्या पत्नी असुन सृष्टीचे जतन, पालनपोषण करण्यासाठी त्या संपत्ती प्रदान करतात.

महालक्ष्मी अष्टकम (Mahalakshmi Ashtakam) देवी लक्ष्मीला समर्पित स्तोत्र असून ते संस्कृतमध्ये आहे. हिंदू धर्मातील संपत्ती आणि समृद्धीची ती देवता आहे. हे स्तोत्र देवीच्या शक्ती आणि वैभवाचे गुणगान करते. या स्तोत्राचा जप केल्याने भौतिक तसेच आध्यात्मिक आनंद मिळतो आणि जीवन यशस्वी होते.

महालक्ष्मी अष्टकम (Mahalakshmi Ashtakam) प्रार्थनेचा उगम:

महालक्ष्मी अष्टकमचा (Mahalakshmi Ashtakam) उल्लेख प्रथम पद्म पुराणात आला होता. भगवान इंद्रांनी हे स्तोत्र उच्चारले होते. पद्म पुराण हे १८ प्रमुख पुराणांपैकी एक आहे. जेव्हा क्षीरसागराच्या (दूध महासागराच्या) मंथनातून देवी लक्ष्मी प्रकटली तेव्हा भगवान इंद्रांनी हे महालक्ष्मी अष्टक बोलून देवीची स्तुती केली होती.

हिंदू पौराणिक कथांमध्ये ही घटना समुद्र मंथन या नावाने ओळखले जाते. पवित्र हिंदू ग्रंथांमध्ये दुधाच्या सागर मंथनाच्या या भागाचे वर्णन आढळते. एकदा दुर्वास ऋषींनी सर्व देवांना शाप दिला. याचा परिणाम म्हणून सर्व देवता कमकुवत व शक्तीहीन झाले. सर्व देव शक्तीहीन झाल्यामुळे सर्व सृष्टी ही असुरांच्या अधिपत्याखाली आली.

यावर भगवान विष्णूंनी देवांना असुरांशी मिळतेजुळते घेण्याचा सल्ला दिला. पुढे देव आणि दानव क्षीरसागराचे मंथन करून अमृत मिळवण्यासाठी एकत्र आले. भगवान विष्णूंनी देखील अमृत देवतांनाच मिळेल याची खात्री केली.

समुद्र मंथनातून असंख्य वस्तू आणि प्राणी उत्पन्न झाले. त्यामध्ये काही दैवी अप्सरा, मौल्यवान रत्ने, इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष, इच्छा पूर्ण करणारी कामधेनु गाय आणि ७ मस्तक असलेला एक दिव्य घोडा होता. यामध्ये एक समृद्धी आणि संपत्ती च्या देवता लक्ष्मी देवी होत्या. जेव्हा लक्ष्मीदेवी दुधाच्या महासागरातून बाहेर आल्या, तेव्हा भगवान इंद्रांनी स्तुती म्हणून महालक्ष्मी अष्टक (Mahalakshmi Ashtak) गायले.

READ  Kalbhairavashtak | कालभैरवाष्टक

श्री रुद्राष्टकम् वाचण्यासाठी Rudrashtakam येथे क्लिक करा.

या स्तोत्राचे नियमितपणे पठण केल्याने श्रीमंती, समृद्धी आणि प्रसन्नता लाभते. या स्तोत्राचे पठण ऐकण्याने आध्यात्मिक आनंद आणि मानसिक शांती देखील मिळू शकते.

Mahalakshmi Ashtak | महालक्ष्मी अष्टक

श्री गणेशाय नमः

नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥

सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥ इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥

(PDF) Download Mahalakshmi Ashtakam | डाउनलोड महालक्ष्मी अष्टकम
Mahalakshmi Ashtakam | Anuradha Paudwal Bhakti Songs | Mahalakshmi Mantra
Mahalakshmi Ashtak | महालक्ष्मी अष्टक

पसायदान वाचण्यासाठी Pasaydan येथे क्लिक करा.
नवग्रह स्तोत्र वाचण्यासाठी Navagrah Stotra येथे क्लिक करा.
श्री शिवस्तुति वाचण्यासाठी Shree Shiv Stuti येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment