परिचय
कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) हे श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे. कालभैरवाष्टक स्तोत्रामध्ये श्री आदि शंकराचार्यांनी कालभैरवाची स्तुती तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केले आहे.
कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) हे कालभैरव म्हणजे काशी (बनारस) स्थित भगवान शिव शंकर यांचे स्तुतीपर स्तोत्र आहे.
कालभैरवाष्टकाच्या पहिल्या मुख्य आठ श्लोकांमध्ये कालभैरवाची स्तुती व व्यक्तिमत्व नमूद केले असून शेवटच्या श्लोकामध्ये या स्तोत्राची फलश्रुती लिहिली आहे.
Benefits of Kalbhairavashtak | कालभैरवाष्टक स्तोत्राचे फायदे:
हिंदू पौराणिक कथांनुसार कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) स्तोत्राचा नियमितपणे जप करणे म्हणजे भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचा आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.
कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते आणि आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात. आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनवते.
साधारणतः कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) स्तोत्राचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी केले जाते.
Kalbhairavashtak | कालभैरवाष्टक
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १॥
भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ २॥
शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ३॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ ४॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ५॥
रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ६॥
अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपात्तनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ७॥
भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ८॥
॥ फल श्रुति ॥
कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं ध्रुवम् ॥
॥ इति कालभैरवाष्टकम् संपूर्णम् ॥
(PDF) Download Kalbhairavashtak | डाउनलोड कालभैरवाष्टक
Meaning of Kalbhairavashtak in Marathi | कालभैरवाष्टक स्तोत्राचा मराठी अर्थ:
ज्यांच्या पवित्र चरण कमलांची देवराज इंद्र नेहमी पूजा करतात, ज्यांनी शिरोभूषण म्हणून चंद्राला धारण केले आहे, सर्प ज्यांनी यज्ञोपवित्र म्हणून धारण केला आहे, जे दिगंबर आहेत व नारद आणि इतर योगिजन ज्यांची पूजा करतात अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।१।।
जे कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहेत, संसाररूपी सागरातून तारणारे, श्रेष्ठ, निळा कंठ असलेले, इच्छित वस्तू देणारे, तीन डोळ्यांचे, कमळासारखे डोळे असणारे आणि अक्षमाला व त्रिशूल धारण करणारे अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।२।।
ज्यांचे शरीर श्यामवर्ण आहे, ज्यांनी हातात शूल, टंक, पाश आणि दंड घेतलेला आहे, जे आदिदेव, अविनाशी आणि आदिकारण आहेत, जे त्रिविध तापांपासून मुक्त आहेत, ज्यांचा पराक्रम महान आहे, जे सर्वसमर्थ आहेत, आणि ज्यांना तांडव नृत्य आवडते अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।३।।
जे स्वरूप सुंदर व प्रशंसनीय आहेत, सर्वसंसार म्हणजे ज्यांचे शरीर आहे, ज्यांच्या कमरेला सुंदर रुणझूण आवाज करणारी सोन्याची साखळी आहे, जे भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहेत, जे भुक्ति व मुक्ती देणारे आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।४।।
जे धर्माचे पालक व अधर्माचा नाश करणारे आहेत, जे कर्मपशापासून सोडवणारे आहेत, जे मोठे कल्याण करणारे व सर्वव्यापक आहेत, ज्यांचे सर्व शरीर सोनेरी रंग असणाऱ्या शेषनागाने सुशोभित आहे अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।५।।
ज्यांच्या पायांमध्ये रत्नजडीत पादुका आहेत, जे निर्मळ, अविनाशी, अद्वितीय आणि सगळ्यांची इष्ट देवता आहेत, जे यमाचा अभिमान नष्ट करणारे व मृत्यूच्या दाढांतून वाचवणारे व मोक्ष देणारे आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।६।।
ज्यांच्या अट्टाहासाने ब्रह्मांडाचा समूह विदीर्ण होतो, ज्यांच्या कृपापूर्ण दृष्टिकटाक्षाने पापांचे डोंगर नष्ट होतात, ज्यांचे शासन कठोर आहे, जे आठ प्रकारची सिद्धी देणारे आहेत, ज्यांनी कपालमाला धारण केली आहे अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।७।।
जे सर्व प्राणिमात्रांचे नायक आहेत, जे आपल्या भक्तांना विशाल कीर्ती देणारे आहेत, जे काशीमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या पाप-पुण्यांचा न्याय करणारे आणि सर्व व्यापक आहेत, जे नीतिमार्ग अनुसरणारे फार प्राचीन आहेत, जे संसाराचे स्वामी आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।८।।
ज्ञान आणि मुक्ती देणाऱ्या, भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या, शोक, मोह, दीनता, लोभ आणि त्रिविध ताप नष्ट करणाऱ्या या मनोहर कालभैरवाष्टकाचे पठण करणारा निश्चितच अंती कालभैरवाच्या चरणकमलांजवळ वास करतो. ।।९।।
नवग्रह स्तोत्र वाचण्यासाठी Navagrah Stotra येथे क्लिक करा.
देवीसूक्तम् वाचण्यासाठी Devisuktam येथे क्लिक करा.
महालक्ष्मी अष्टक वाचण्यासाठी Mahalakshmi Ashtak येथे क्लिक करा.