You are currently viewing Shree Ganpati Stotra | श्री गणपती स्तोत्र

Shree Ganpati Stotra | श्री गणपती स्तोत्र

Shree Ganpati Stotra | श्री गणपती स्तोत्र:

श्री गणपती ज्यांची कोणत्याही मंगल समयी सगळ्यात आधी पूजा केली जाते. त्यांची सगळ्या देवी देवतांमध्ये सगळ्यात आधी आराधना केली जाते. त्यांना लंबोदर, विघ्नहर्ता, गजानन, गणपती अशा अनेक नावांनी संबोधले जाते. अशा विघ्न हरणाऱ्या तसेच बुध्दी आणि यश मिळवून देणाऱ्या श्री गणेशाची आराधना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. यात श्री गणपती स्तोत्राला (Shree Ganpati Stotra) अनन्य साधारण महत्व आहे. असे म्हणतात कि रोज गणपती स्तोत्र म्हटल्याने जीवनातील समस्या दूर होतात.

श्री गणपती स्तोत्र  (Shree Ganpati Stotra) हे संस्कृतमध्ये असून ते नारद मुनींच्या नारद पुराणातून घेतले आहे. या स्तोत्रात नारद मुनी श्री गणेशाच्या १२ नावांचा उल्लेख करत त्याच्या भव्यतेचे वर्णन करतात. दीर्घ आयुष्यासाठी आणि सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येकाने गणपती पुढे नतमस्तक व्हावे आणि गणपती ची उपासना करावी, असे नारद मुनी म्हणतात.

मराठी श्री गणपती स्तोत्र  (Shree Ganpati Stotra) हा मूळ संस्कृत स्तोत्राचा अनुवाद असून तो श्रीधर स्वामींनी केला आहे.

श्री मारुती स्तोत्र वाचण्यासाठी Shree Maruti Stotra | श्री मारुती स्तोत्र येथे क्लिक करा.

असे म्हणतात कि गणपतीची उपासना सर्व मनोकामना पूर्ण करते. पैशाचा शोध घेणारी व्यक्ती श्रीमंत होते, ज्ञानाचा शोध घेणारी व्यक्ती ज्ञान प्राप्त करते, आणि मोक्ष शोधणारी व्यक्ती मोक्ष प्राप्त करते. असा विश्वास प्रकट केला जातो कि कोणीही सहा महिने दररोज या स्तोत्राचे पठण केले तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने त्याचे सर्व त्रास, अडचणी नष्ट होतात. जर कोणी वर्षभर हे स्तोत्र रोज वाचत असेल तर तो सर्व सिद्धींचा स्वामी होतो.

येथे आपण संस्कृत आणि मराठी दोन्ही  श्री गणपती स्तोत्र  (Shree Ganpati Stotra) पाहणार आहोत.

Shree Ganpati Stotra (Sanskrit) | श्री गणपती स्तोत्र (संस्कृत)

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम

(PDF) Download Shree Ganpati Stotra (Sanskrit) | श्री गणपती स्तोत्र (संस्कृत)
Shree Ganpati Stotra (Sanskrit) | श्री गणपती स्तोत्र (संस्कृत)

करुणाष्टके वाचण्यासाठी Karunashtake | करुणाष्टके येथे क्लिक करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा