Shree Hanuman Chalisa | श्री हनुमान चालीसा

परिचय

श्री हनुमान चालीसा (Shree Hanuman Chalisa) हे हनुमानावरील चाळीस चौपाई (श्लोक) म्हणजे भगवान हनुमानाला संबोधित केलेले हिंदू भक्ती स्तोत्र आहे. याचे लिखाण १६ व्या शतकातील संत कवी तुलसीदास यांनी अवधी भाषेत केले होते. तुलसीदास यांच्या लिखाण कार्यातील रामचरितमानास नंतरचे हे सर्वात प्रसिद्ध लिखाण कार्य आहे. “चालीसा” हा शब्द हिंदीतील चालीस वरून आला आहे, कारण हनुमान चालीसेमध्ये ४० श्लोक आहेत (सुरुवातीचे आणि शेवटचे दोहे वगळता).

हनुमान हा रामभक्त आणि रामायण या महाकाव्यातील मुख्य पात्रांपैकी एक आहे. काही मान्यतांनुसार हनुमान हा भगवान शंकरांचा अवतार आहे. हनुमानाच्या सामर्थ्याची प्रशंसा करणाऱ्या लोककथा सर्वत्र सांगितल्या जातात.

हनुमानाचे गुण, त्याचे सामर्थ्य, धैर्य, शहाणपण, ब्रह्मचर्य, हनुमानाची श्रीराम भक्ती आणि हनुमानाची विविध नावे याचे वर्णन हनुमान चालीसेमध्ये (Shree Hanuman Chalisa) तपशीलवार केलेले आहे. हनुमान चालीसेचे पठण किंवा जप करणे ही हिंदू लोकांमधील एक सामान्य धार्मिक प्रथा आहे. श्री हनुमान चालीसा हे भगवान हनुमानाची स्तुती करणारे सर्वात लोकप्रिय स्तोत्र आहे आणि दररोज कोट्यावधी हिंदू याचे पठण करतात.

हनुमान चालीसेच्या (Shree Hanuman Chalisa) शेवटच्या श्लोकात असे म्हटले आहे की जो कोणी पूर्ण भक्तीभावाने हनुमान चालीसेचा जप करतो त्याला हनुमानाची कृपा प्राप्त होते. हनुमान चालीसेचा जप केल्याने हनुमान कृपेने गंभीर समस्यांचे निवारण होते आणि दृष्ट शक्तींपासून संरक्षण होते, अशी जगभरातील हिंदूंमध्ये मान्यता आहे.

श्री राम रक्षा स्तोत्र वाचण्यासाठी Shree Ram Raksha Stotra | श्री राम रक्षा स्तोत्र  येथे क्लिक करा.

लेखकाविषयी (संत तुलसीदास):

तुलसीदास(Tulsidas) हे हिंदू कवी-संत, सुधारक आणि रामाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असलेले तत्वज्ञ होते. त्यांनी कित्येक लोकप्रिय रचनांचे लिखाण केले आहे. ते रामचरितमानस या महाकाव्याचे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. तुलसीदास त्यांच्या मृत्यूपर्यंत वाराणसी शहरात राहत होते. वारणासीतील तुलसी घाटाचे नाव त्यांच्या नावावर आहे. वाराणसीमध्ये जिथे हनुमानाने तुलसीदासांना दर्शन दिले होते त्या ठिकाणी हनुमानाला समर्पित संकट मोचन हनुमान मंदिराची स्थापना त्यांनी केली.

READ  Navagrah Stotra | नवग्रह स्तोत्र

तुलसीदास यांनी रामलीला नाटकांची सुरूवात केली, हे रामायणाचे लोक-नाट्यरूप आहे. हिंदी, भारतीय आणि जागतिक साहित्यातील एक महान कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. भारतातील कला, संस्कृती आणि समाज यावर तुलसीदास आणि त्याच्या लिखाणाचा व्यापक प्रभाव आहे.

श्री हनुमान चालीसेच्या (Shree Hanuman Chalisa) रचनेविषयी:

सुरुवातीला दोन प्रास्तावनात्मक दोहे, चाळीस चौपाई (श्लोक) आणि शेवटी एक दोहा – अशा प्रकारे श्री हनुमान चालीसे मध्ये (Shree Hanuman Chalisa) त्रेचाळीस (४३) श्लोक आहेत. हनुमानाचे शुभ स्वरूप, ज्ञान, सद्गुण, शक्ती आणि शौर्य यांचे वर्णन पहिल्या दहा चौपायांमध्ये केले गेले आहे. अकरा ते वीस चौपायांमध्ये प्रभू श्री रामांच्या सेवेतील हनुमानाच्या कृतींचे वर्णन आहे त्यात अकरा ते पंधरा चौपाई मध्ये लक्ष्मणाला मुर्च्छित अवस्तेतून बाहेर काढण्यात हनुमानाच्या भूमिकेचे वर्णन केले आहे. एकविसाव्या चौपाईपासून तुळशीदास हनुमानाच्या कृपेची आवश्यकता का आहे, याचे वर्णन करतात. शेवटी, तुळशीदास हनुमानाला भक्तिभावाने अभिवादन करतात आणि आपल्या अंत:करणात आणि वैष्णवांच्या हृदयात वास करण्याची विनंती करतात. शेवटच्या दोह्यामध्ये पुन्हा हनुमानास राम, लक्ष्मण आणि सीतेसमवेत आपल्या अंतःकरणामध्ये राहण्याची विनंती करतात.

Shree Hanuman Chalisa | श्री हनुमान चालीसा

॥दोहा॥

श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि ।।

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार ।
बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार ।।

॥चौपाई॥

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ।। १ ।।

राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा ।। २ ।।

महाबीर बिक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ।। ३ ।।

कंचन बरन बिराज सुबेसा ।
कानन कुंडल कुंचति केसा ।। ४ ।।

हाथ बज्र औ ध्वजा बिराजै ।
काँधे मूँज जनेऊ साजै ।। ५ ।।

संकर सुवन केसरीनंदन ।
तेज प्रताप महा जग बंदन ।। ६ ।।

बिद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ।। ७ ।।

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ।। ८ ।।

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
बिकट रूप धरि लंक जरावा ।। ९ ।।

भीम रूप धरि असुर सँहारे ।
रामचंद्र के काज सँवारे ।। १० ।।

लाय सजीवन लखन जियाये ।
श्रीरघुबीर हरषि उर लाये ।। ११ ।।

रघुपति कीन्ही बहुत बडाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ।। १२ ।।

सहस बदन तुम्हरो जस गावैं ।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं ।। १३ ।।

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ।। १४ ।।

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कबि कोबिद कहि सके कहाँ ते ।। १५ ।।

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ।। १६ ।।

तुम्हरो मन्त्र बिभीषन माना ।
लंकेस्वर भए सब जग जाना ।। १७ ।।

जुग सहस्र जोजन पर भानू ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ।। १८ ।।

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लांघि गये अचरज नाहीं ।। १९ ।।

दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ।। २० ।।

राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ।। २१ ।।

सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रच्छक काहू को डर ना ।। २२ ।।

आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हाँक ते काँपै ।। २३ ।।

भूत पिसाच निकट नहिं आवै ।
महाबीर जब नाम सुनावै ।। २४ ।।

नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरंतर हनुमत बीरा ।। २५ ।।

संकट तें हनुमान छुडावै ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै ।। २६ ।।

सब पर राम तपस्वी राजा ।
तिन के काज सकल तुम साजा ।। २७ ।।

और मनोरथ जो कोइ लावै ।
सोइ अमित जीवन फल पावै ।। २८ ।।

चारों जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ।। २९ ।।

साधु संत के तुम रखवारे ।
असुर निकंदन राम दुलारे ।। ३० ।।

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ।। ३१ ।।

राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ।। ३२ ।।

तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ।। ३३ ।।

अंत काल रघुबर पुर जाई ।
जहाँ जन्म हरि-भक्त कहाई ।। ३४ ।।

और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेइ सर्ब सुख करई ।। ३५ ।।

संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरै हनुमत बलबीरा ।। ३६ ।।

जै जै जै हनुमान गोसाई ।
कृपा करहु गुरु देव की नाई ।। ३७ ।।

जो सत बार पाठ कर कोई ।
छूटहि बंदि महा सुख होई ।। ३८ ।।

जो यह पढै हनुमानचालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ।। ३९ ।।

तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय महँ डेरा ।। ४० ।।

॥दोहा॥

पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ।।

READ  Shri Saraswati Stotram | श्री सरस्वती स्तोत्र
(PDF) Download Shree Hanuman Chalisa | डाउनलोड 0
श्री हनुमान चालीसा 🌺🙏| Shree Hanuman Chalisa Original Video |🙏🌺| GULSHAN KUMAR | HARIHARAN |Full HD

करुणाष्टके वाचण्यासाठी Karunashtake | करुणाष्टके  येथे क्लिक करा.
श्री मारुती स्तोत्र वाचण्यासाठी Shree Maruti Stotra | श्री मारुती स्तोत्र  येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

1 thought on “Shree Hanuman Chalisa | श्री हनुमान चालीसा”

Leave a Comment

Share via
Copy link