Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

श्री व्यंकटेश स्तोत्र (Shree Vyankatesh Stotra) मराठी भाषेत असून हे स्तोत्र देवीदास यांनी लिहिले आहे. यात १०८ श्लोक आहेत. श्री व्यंकटेश्वराचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचे पठण केले जाते. असे म्हणतात की श्री व्यंकटेश स्तोत्राचे (Shree Vyankatesh Stotra) नियमित एकाग्रतेने पठण केल्याने सर्व दुःख आणि अडचणी नाहीशा होतात, ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते, गरिबाना धनलाभ होतो, श्री व्यंकटेश्वच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात.

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

श्रीगणेशाय नमः । श्रीव्यंकटेशाय नमः ।

ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा ।
आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥

नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी ।
ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥

नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया ।
स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणें श्रोतया सुख वाटे ॥ ३ ॥

नमन माझे संतसज्जना । आणि योगियां मुनिजनां ।
सकळ श्रोतयां सज्जना । नमन माझे साष्टांगी ॥ ४ ॥

ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषासी दाहक ।
तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ॥ ५ ॥

जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा ।
परंज्योति प्रकाशगहना । करितों प्रार्थना श्रवण कीजे ॥ ६ ॥

जननीपरी त्वा पाळिलें । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासूनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ॥ ७ ॥

हें अलोलिक जरी मानावें । तरी जग हें सृजिलें आघवें ।
जनकजनीपण स्वभावें । सहज आलें अंगासी ॥ ८ ॥

दीनानाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी ।
प्रेम दिधलें अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ॥ ९ ॥

आतां परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा ।
मज घालोनी गर्भाधाना । अलौकिक रचना दाखविली ॥ १० ॥

तुज न जाणतां झालों कष्टी । आतां दृढ तुझे पायीं घातली मिठी ।
कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटीं घालीं माझें ॥ ११ ॥

माझिया अपराधांच्या राशी । भेदोनि गेल्या गगनासी ।
दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करीं ॥ १२ ॥

पुत्राचे सहस्त्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद ।
तेवीं तू कृपाळू गोविंद । मायबाप मजलागी ॥ १३ ॥

उदडांमाजी काळेगोरे । काय निवडावें निवडणारे ।
कुचलिया वृक्षांची फळें । मधुर कोठोनि असतील ॥ १४ ॥

अराटीलागीं मृदुला । कोठोनि असेल कृपावंता ।
पाषाणासी गुल्मलता । कैसियापरी फुटतील ॥ १५ ॥

आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरीं पडिलों पाहीं ।
आतां रक्षण नाना उपायीं । करणें तुज उचित ॥ १६ ॥

समर्थाचिये घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान ।
तैसा तुज म्हणवितों दीन । हा अपमान कवणाचा ॥ १७ ॥

लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनि झोळी ।
येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा ॥ १८ ॥

कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारीं ।
यांत पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पैं आला ॥ १९ ॥

द्रौपदीसी वस्त्रें अनंता । देत होतासी भाग्यवंता ।
आम्हांलागी कृपणता । कोठोनि आणिली गोविंदा ॥ २० ॥

मावेची करुनी द्रौपदी सती । अन्ने पुरविलीं मध्यरातीं ।
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या क्षणमात्रें ॥ २१ ॥

अन्नासाठी दाही दिशा । आम्हा फिरविसी जगदिशा ।
कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैसी तुज न ये ॥ २२ ॥

अंगीकासा री या शिरोमणी । तुज प्रार्थितो मधुर वचनीं ।
अंगीकार केलिया झणीं । मज हातीचे न सोडावें ॥ २३ ॥

समुद्रे अंगीकारिला वडवानळ । तेणें अंतरी होतसे विव्हळ ।
ऐसें असोनि सर्वकाळ । अंतरी सांठविला तयानें ॥ २४ ॥

कूर्में पृथ्वीचा घेतला भार । तेणे सोडिला नाहीं बडिवार ।
एवढा ब्रह्मांड गोळ थोर । त्याचा अंगीकार पै केला ॥ २५ ॥

शंकरे धरिलें हाळाहळा । तेणे नीळवर्ण झाला गळा ।
परी त्यागिले नाही गोपाळा । भक्तवत्सला गोविंदा ॥ २६ ॥

माझ्या अपराधांच्या परी । वर्णितां शिणली वैखरी ।
दुष्ट पतित दुराचारी । अधमाहूनि अधम ॥ २७ ॥

विषयासक्त मंदमति आळशी । कृपण कुव्यसनी मलिन मानसीं ।
सदा सर्वकाळ सज्जनांसी । द्रोह करी सर्वदा ॥ २८ ॥

वचनोक्ति नाहीं मधुर । अत्यंत जनासी निष्ठुर ।
सकळ पामरांमाजीं पामर । व्यर्थ बडिवार जगी वाजे ॥ २९ ॥

काम क्रोध मद मत्सर । हें शरीर त्यांचे बिढार ।
कामकल्पनेसी थोर । दृढ येथे केला असे ॥ ३० ॥

अठरा भार वनस्पतींची लेखणी । समुद्र भरला मषीकरुनी ।
माझे अवगुण लिहितां धरणीं । तरी लिहिले न जाती गोविंदा ॥ ३१ ॥

ऐसा पतित मी खरा । तरी तूं पतितपावन शारङ्गधरा ।
तुवां अंगीकार केलिया गदाधरा । कोण गुणदोष गणील ॥ ३२ ॥

नीचा रतली रायासीं । तिसी कोण म्हणेल दासी ।
लोह लागतां परिसासी । पूर्वस्थिती मग कैंची ॥ ३३ ॥

गांवीचे होते लेंडवोहळ । गंगेसी मिळतां गंगाजळ ।
काकविष्ठेचे झाले पिंपळ । तयांसी निंद्य कोण म्हणे ॥ ३४ ॥

तैसा कुजाति मी अमंगळ । परी तुझा म्हणवितो केवळ ।
कन्या देऊनियां कुळ । मग काय विचारावे ॥ ३५ ॥

जाणत असतां अपराधी नर । तरी कां केला अंगीकार ।
अंगीकारावरी अव्हेर । समर्थें केला न पाहिजे ॥ ३६ ॥

READ  Shri Kalbhairav Stotra | श्री कालभैरव स्तोत्र
(PDF) Download Shree Vyankatesh Stotra | डाउनलोड श्री व्यंकटेश स्तोत्र

अन्नपूर्णा स्तोत्र वाचण्यासाठी Annapurna Stotra  येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

2 thoughts on “Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र”

  1. श्री व्यंकटेश स्तोत्रात ‘विवेकखाणीवैरागवरा’ असा एक शब्द आहे. त्याचा कृपया अर्थ कळवावा.

    उत्तर
    • टायपिंग मिस्टेक होती.
      ते विवेकखाणीवैरागरा आहे.

      विवेकखाणी – विवेकाची खाण
      वैरागर – हिर्‍यांची किंवा रत्नांची खाण

      उत्तर

Leave a Comment

Share via
Copy link