Shiv Tandav Stotra | शिव तांडव स्तोत्र

शिव तांडव स्तोत्र (Shiv Tandav Stotra) हे भगवान शंकरांची (शिवांची) स्तुती करणारे स्तोत्र असून त्यात भगवान शिवांची शक्ती आणि सौंदर्याचे वर्णन आहे. शिव तांडव स्तोत्र हे विद्वान आणि शिवांचे परम भक्त लंकाधिपती रावण यांनी रचले आहे.

कथा अशी आहे की, एकदा रावण भगवान शिवाचे निवासस्थान असलेला कैलास पर्वत आपल्या खांद्यावर उचलून लंकेला नेण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने कैलास पर्वत आपल्या खांद्यावर उचलला. असे करत असताना रावणाच्या मनात आपल्या शक्तीविषयी, सामर्थ्याविषयी गर्व निर्माण झाला. भगवान शिवांना रावणाचे आपल्या सामर्थ्याचा असा गर्व करणे आवडले नाही. त्यांनी रावणाचा गर्व हरण करण्याचे ठरवले. भगवान शिवांनी त्यांच्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वतावर थोडेसे दाबले. त्यामुळे कैलास पर्वत पुन्हा जागच्या जागी स्थिर झाला, आणि रावणाचे हाथ कैलास पर्वताखाली दाबले गेले. हाथ पर्वताखाली दाबले गेल्यामुळे रावण वेदनेने आर्तनाद करू लागला – भगवान शिवांची माफी मागू लागला, त्यांची स्तुती करू लागला. यालाच पुढे शिव तांडव स्तोत्र (Shiv Tandav Stotra) म्हणून ओळखले जाऊ लागले.

शिव तांडव स्तोत्राने भगवान शिव इतके खुश झाले की त्यांनी रावणाला सिद्धी, समृद्धी आणि सोन्याची लंका याचबरोबर संपूर्ण ज्ञान, विज्ञान आणि अमरत्वाचे वरदान देखील दिले. असे म्हणतात की केवळ शिव तांडव स्तोत्र (Shiv Tandav Stotra) ऐकून एखाद्या व्यक्तीला धन, समृद्धी किंवा शांती मिळते.

अन्नपूर्णा स्तोत्र वाचण्यासाठी Annapurna Stotra | अन्नपूर्णा स्तोत्र  येथे क्लिक करा.

हे स्तोत्र संस्कृत मध्ये आहे. या स्त्रोताची भाषा ही अद्वितीय आणि गुंतागुंतीची आहे, परंतु महाविद्यावान रावणाने ते काही क्षणातच रचले. सुंदर भाषा आणि काव्यात्मक शैलीमुळे या शिव तांडव स्तोत्राला (Shiv Tandav Stotra) विशेषतः शिवस्तोत्रांमध्ये विशेष स्थान आहे.

असे म्हटले जाते की देवांचे देव महादेव यांची उपासना एखाद्या व्यक्तीला जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करते. शिवपूजनामध्ये शिव तांडव स्तोत्राचे (Shiv Tandav Stotra) पठण करून भगवान शंकरांचे आशीर्वाद जीवनाच्या संकटातून बचाव करण्यासाठी ढाल म्हणून काम करतात.

READ  Shri Rudrashtakam | श्री रुद्राष्टकम्: भगवान शिवाचे दैवी स्तोत्र (अर्थासह)

शिव कृपा प्राप्त करण्यासाठी आणि चांगली गती प्राप्त करण्यासाठी, प्रदोष काळात या शिव तांडव स्तोत्राचा (Shiv Tandav Stotra) पाठ करणे खूप फलदायी मानले जाते. शिवपूजनाच्या वेळी स्त्रोत्राचे पठण केल्याने मुलांपासून सुख, आनंद तसेच संपत्ती मध्ये वाढ होते.

Shiv Tandav Stotra | शिव तांडव स्तोत्र

जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव लम्ब्यलम्बितां भुजंगतुंग मालिकाम्‌।
डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव: शिवम्‌ ॥१॥

जटाकटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि।
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम: ॥२॥

धराधरेंद्रनंदिनी विलासबन्धुबन्धुर स्फुरद्दिगंतसंतति प्रमोद मानमानसे।
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि क्वचिद्विगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि ॥३॥

जटाभुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्व धूमुखे।
मदांधसिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे मनोविनोदद्भुतं बिंभर्तुभूत भर्तरि ॥४॥

सहस्रलोचन प्रभृत्यशेषलेखशेखर प्रसूनधूलिधोरणी विधूसरां घ्रिपीठभूः।
भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः श्रियैचिरायजायतां चकोरबंधुशेखरः ॥५॥

ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा निपीतपंच सायकंनम न्निलिंपनायकम्‌।
सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तुनः ॥६॥

करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल द्धनंजया धरीकृतप्रचंड पंचसायके।
धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्र कप्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचनेरतिर्मम ॥७॥

नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर त्कुहुनिशीथनीतमः प्रबद्धबद्धकन्धरः।
निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिंधुरः कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥८॥

प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम्‌।
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥९॥

अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्‌।
स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥१०॥

जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुरद्ध गद्धगद्विनिर्गमत्कराल भाल हव्यवाट्।
धिमिद्धिमिद्धि मिध्वनन्मृदंग तुंगमंगलध्वनिक्रमप्रवर्तित: प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥११॥

दृषद्विचित्रतल्पयो र्भुजंगमौक्तिकमस्र जोर्गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः।
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥१२॥

कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌ विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌।
विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन्‌ कदा सुखी भवाम्यहम्‌ ॥१३॥

निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः।
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥१४॥

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना।
विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌ ॥१५॥

इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं पठन्स्मरन्‌ ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम्‌।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथागतिं विमोहनं हि देहिनांं सुशंकरस्य चिंतनम् ॥१६॥

पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं यः शम्भूपूजनपरम् पठति प्रदोषे।
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥१७॥

॥ इति रावणकृतं शिव ताण्डवस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

READ  Bhaktamar Stotra | भक्तामर स्तोत्र
(PDF) Download Shiv Tandav Stotra | डाउनलोड शिव तांडव स्तोत्र
Shiv Tandav Stotram | Shankar Mahadevan | रावण रचित शिव तांडव स्तोत्र
Shiv Tandav Stotra | शिव तांडव स्तोत्र

श्री मारुती स्तोत्र वाचण्यासाठी Shree Maruti Stotra | श्री मारुती स्तोत्र  येथे क्लिक करा.
श्री गणपती स्तोत्र वाचण्यासाठी Shree Ganpati Stotra | श्री गणपती स्तोत्र  येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment