Shri Mangal Chandika Stotra | श्री मंगल चंडिका स्तोत्र

परिचय

श्री मंगल चंडिका स्तोत्र (Shri Mangal Chandika Stotra) हे संस्कृतमध्ये आहे. या स्तोत्राचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती-खंडामधील अध्याय ४४/२०-३६ मध्ये आढळते.

“ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके ऐं क्रूं फट् स्वाहा”

या पवित्र मंत्राने श्री मंगल चंडिका स्तोत्राची सुरुवात होते. या मंत्राचा १० लाख वेळा जप केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

स्तोत्राच्या ध्यान या भागात भगवती चंडिका देवीचे आणि तिच्या तेजाचे वर्णन आहे. तसेच भगवती चंडिका धन संपत्ती सोबत सांसारिक कर्तव्ये पार पडण्यास कशा प्रकारे मदत करते याचे वर्णन आहे.

श्री मंगल चंडिका स्तोत्राच्या शंकर उवाच या भागात भगवान शंकर देवीच्या गुणांचे वर्णन करून या स्तोत्राच्या पठाणाची फलश्रुती (फायदे) सांगतात.

शिव तांडव स्तोत्र वाचण्यासाठी Shiv Tandav Stotra | शिव तांडव स्तोत्र  येथे क्लिक करा.

श्री मंगल चंडिका स्तोत्राची फलश्रुती (फायदे)

  • श्री मंगल चंडिका स्तोत्राच्या फलश्रुती मध्ये दिल्याप्रमाणे श्री मंगल चंडिका स्तोत्राचे पठण केल्याने सर्व दु:ख दूर होतात.
  • श्रावण महिन्यातील मंगळवारी श्री मंगल चंडिका स्तोत्राचे पठण करणे शुभ मानले जाते.
  • श्रावण महिन्यात मंगल चंडिका मातेचे व्रत आणि पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते.
  • मंगल चंडिकेचे पठण केल्याने विवाहात बाधा येत नाही आणि घरगुती त्रासही दूर होतात.
  • विवाह आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी मंगल चंडिका स्तोत्राचा पाठ केला जातो.
  • या स्रोताच्या महती विषयी भगवान शिवांनी स्वतः सांगितले आहे; ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो, मंगळामुळे जर त्या लोकांच्या लग्नात आणि कामात अडथळे येत असतील, तर हे स्तोत्र त्यांना चमत्कारिक लाभ देते.

श्री मंगल चंडिका स्तोत्र

II श्री मंगलचंडिकास्तोत्रम् II

ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके I
ऐं क्रूं फट् स्वाहेत्येवं चाप्येकविन्शाक्षरो मनुः II
पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः I
दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम् II
मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः I
ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्व सम्मतम् II

II ध्यान II

देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् I
सर्वरूपगुणाढ्यां च कोमलाङ्गीं मनोहराम् II
श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम् I
वन्हिशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम् II
बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम् I
बिम्बोष्टिं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् II
ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोल्पललोचनाम् I
जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसंपदाम् II
संसारसागरे घोरे पोतरुपां वरां भजे II
देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने I
प्रयतः संकटग्रस्तो येन तुष्टाव शंकरः II

II शंकर उवाच II

रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्गलचण्डिके I
हारिके विपदां राशेर्हर्षमङ्गलकारिके II
हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलचण्डिके I
शुभे मङ्गलदक्षे च शुभमङ्गलचण्डिके II
मङ्गले मङ्गलार्हे च सर्व मङ्गलमङ्गले I
सतां मन्गलदे देवि सर्वेषां मन्गलालये II
पूज्या मङ्गलवारे च मङ्गलाभीष्टदैवते I
पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य संततम् II
मङ्गलाधिष्टातृदेवि मङ्गलानां च मङ्गले I
संसार मङ्गलाधारे मोक्षमङ्गलदायिनि II
सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् I
प्रतिमङ्गलवारे च पूज्ये च मङ्गलप्रदे II
स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्गलचण्डिकाम् I
प्रतिमङ्गलवारे च पूजां कृत्वा गतः शिवः II
देव्याश्च मङ्गलस्तोत्रं यः श्रुणोति समाहितः I
तन्मङ्गलं भवेच्छश्वन्न भवेत् तदमङ्गलम् II
II इति श्री ब्रह्मवैवर्ते मङ्गलचण्डिका स्तोत्रं संपूर्णम् II

READ  Shri Kalbhairav Stotra | श्री कालभैरव स्तोत्र

(PDF) Download Shri Mangal Chandika Stotra | श्री मंगल चंडिका स्तोत्र

श्री मंगल चंडिका स्तोत्र मराठी अर्थ

II श्री मंगलचंडिकास्तोत्रम् II
ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके I
ऐं क्रूं फट् स्वाहेत्येवं चाप्येकविन्शाक्षरो मनुः II
पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः I
दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम् II
मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः I
ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्व सम्मतम् II

भगवान नारायण म्हणाले, “ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके ऐं क्रूं फट् स्वाहा” हा एकवीस अक्षरांचा मंत्र कल्पवृक्षासमान भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. ह्या मंत्राचा दहा लाख जप केल्यावर हा सिद्ध होतो. ब्रह्मन् आता मङ्गलचण्डिकेचे ध्यान कसे आहे ते ऐका.

देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् I 
सर्वरूपगुणाढ्यां च कोमलाङ्गीं मनोहराम् II 
श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम् I
वन्हिशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम् II 
बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम् I
बिम्बोष्टिं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् II 
ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोल्पललोचनाम् I 
जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसंपदाम् II 
संसारसागरे घोरे पोतरुपां वरां भजे II 
देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने I
प्रयतः संकटग्रस्तो येन तुष्टाव शंकरः II

 नेहमी यौवनात असलेली भगवती मङ्गलचण्डिका सदा सोळावर्षांची दिसते. ती संपूर्ण रूप-गुणाने संपन्न, कोमलांगी आणि मनोहारिणी आहे. पांढऱ्या चंपा फुलाप्रमाणे गौरवर्ण आणि करोडो चंद्रांच्या तेजाप्रमाणे हीची कांती मनोहर आहे.

तीने अग्नीने शुद्ध केलेली वस्त्रे धारण केलेली असून रत्नमय आभूषणे तीने धारण केलेली आहेत. मल्लिका पुष्पांच्या वेणीने तीचे केस शोभत आहेत. बिम्बासारके लाल ओठ, सुंदर दंत-पंक्ती तसेच शरद ऋतूत उमललेल्या कमळासारखे मुख व त्यावर मंद हास्याची छटा शोभून दिसत आहे.

सर्वांना संपदा देणारी ही जगदंबा नावेसारखी संसार सागरात तारून नेते. मी नेहमी हिचे भजन करतो. असे हे भगवती मङ्गलचण्डिकेचे ध्यान आहे.

शंकर उवाच रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्गलचण्डिके I
हारिके विपदां राशेर्हर्षमङ्गलकारिके II 
हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलचण्डिके I 
शुभे मङ्गलदक्षे च शुभमङ्गलचण्डिके II
मङ्गले मङ्गलार्हे च सर्व मङ्गलमङ्गले I 
सतां मन्गलदे देवि सर्वेषां मन्गलालये II 
पूज्या मङ्गलवारे च मङ्गलाभीष्टदैवते I 
पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य संततम् II 
मङ्गलाधिष्टातृदेवि मङ्गलानां च मङ्गले I 
संसार मङ्गलाधारे मोक्षमङ्गलदायिनि II
सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् I 
प्रतिमङ्गलवारे च पूज्ये च मङ्गलप्रदे II 
स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्गलचण्डिकाम् I 
प्रतिमङ्गलवारे च पूजां कृत्वा गतः शिवः II
देव्याश्च मङ्गलस्तोत्रं यः श्रुणोति समाहितः I
तन्मङ्गलं भवेच्छश्वन्न भवेत् तदमङ्गलम् II
II इति श्री ब्रह्मवैवर्ते मङ्गलचण्डिका स्तोत्रं संपूर्णम् II

तसेच तिचे स्तवन आहे, ते ऐका; शंकर म्हणाले, हे जगन्माते मंगलचंडिके ! तू सर्व विपत्तिन्चा नाश करणारी आहेस. तसेच सदा आनंद व कल्याण निर्माण करणारी आहेस. माझे रक्षण कर. माझे रक्षण कर.

READ  Devisuktam | देवीसूक्तम्

खुल्या हातांनी आनंद व कल्याण देणाऱ्या हर्षमंगलचंडिके ! तू शुभा, मंगलदक्षा, शुभमङ्गलचण्डिका, मंगला, मंगल करणारी तसेच सर्वमंगलमंगला म्हणून ओळखली जातेस. हे देवी ! साधू-सज्जनांचे कल्याण करण्याचा तुझा स्वाभाविक गुण आहे. तू सर्वांसाठी मंगलाचा आश्रय आहेस. देवी तू मंगल ग्रहाची इष्टदेवी आहेस. मंगळवारी तुझी पूजा केली पाहिजे.

मनु-वंशामधिल राजा मंगलाची तू पूजनीय देवी आहेस. हे मंगलाधिष्टात्री देवी ! सर्व मंगलान्नाही मंगल आहेस. जगांतील सर्व मंगल लोक तुझेच आश्रित आहेत. तू सर्वांना मोक्ष देऊन मंगल करणारी आहेस. मंगळवारी पूजा केल्यावर मंगलमय सुख देणारी देवी ! तू संसारांतील सारभूत मंगलाधारा असून सर्व कर्मांच्या पार/ बाहेर आहेस.

या स्तोत्राने स्तुती करून भगवान शंकरांनी देवी मंगल-चंडिकेची उपासना केली. प्रत्येक मंगळवारी त्यांनी तीचे पूजन केले. अशा रीतीने भगवती सर्वमंगला सर्वप्रथम भगवान शंकरांकडून पूजिली गेली आहे. तिचा दुसरा उपासक मंगल ग्रह, तिसरा उपासक राजा मंगल आणि चौथ्यावेळी काही सुंदर स्त्रियांनी या देवीचे पूजन केले आहे. पाचव्या वेळी मंगल व्हावे म्हणून पुष्कळ लोकांनी देवी मंगल-चंडिकेचे पूजन केले. त्यानंतर विश्वेश भगवान शंकरांनी पुजलेली ही देवी सर्व विश्वांत नेहमी पुजली जाऊ लागली. हे मुने ! यानंतर देव, मुनी, मनु, मानव आणि इतर सर्व या परमेश्वरीचे पूजन करू लागले.

जो कोणी मनाला एकाग्र करून या मंगलमय स्तोत्राचे श्रवण करतो त्याचे सदा मंगल, कल्याण होते. अमंगल त्याचे जवळ येत नाही. त्याच्या वंशाची वृद्धी होते आणि त्याला प्रत्येक दिवशी मंगलाचाच अनुभव येतो. अशारितीने हे ब्रह्मवैवर्त पुराणांतील मंगल-चंडीका स्तोत्र संपूर्ण झाले.

श्री सरस्वती स्तोत्र वाचण्यासाठी Shri Saraswati Stotram येथे क्लिक करा.

श्री मंगल चंडिका स्तोत्र हिंदी अर्थ

“ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके ऐं क्रूं फट् स्वाहा” इक्कीस अक्षरका यह मन्त्र सुपूजित होनेपर भक्तोंकी संपूर्ण कामना प्रदान करनेके लिये कल्पवृक्षस्वरुप है ।

ब्रह्मन् ! अब ध्यान सुनो । सर्वसम्मत ध्यान वेदप्रणित है । “सुस्थिर यौवना भगवती मङ्गलचण्डिका सदा सोलह वर्षकी ही जान पडती हैं । ये सम्पूर्ण रुप-गुणसे सम्पन्न, कोमलाङ्गी एवं मनोहारिणी हैं । श्र्वेत चम्पाके समान इनका गौरवर्ण तथा करोडों चन्द्रमाओंके तुल्य इनकी मनोहर कान्ति हैं ।

वे अग्निशुद्ध दिव्य वस्त्र धारण किये रत्नमय आभूषणोंसे विभूषित हैं । मल्लिका पुष्पोंसे समलंकृत केशपाश धारण करती हैं । बिम्बसदृश लाल ओठ, सुन्दर दन्त पक्तिं तथा शरत्कालके प्रफुल्ल कमलकी भाँति शोभायमान मुखवाली मङ्गलचण्डिका के प्रसन्न अरविंद जैसे वदनपर मन्द मुस्कानकी छटा छा रही हैं ।

READ  Shree Ram Raksha Stotra | श्री राम रक्षा स्तोत्र

इनके दोनों नेत्र सुन्दर खिले हुए नीलकमलके समान मनोहर जान पडते हैं । सबको सम्पूर्ण सम्पदा प्रदान करनेवाली ये जगदम्बा घोर संसार सागरसे उबारनेमें जहाजका काम करती हैं । मैं सदा इनका भजन करता हूँ ।”

मुने ! यह तो भगवती मङ्गलचण्डिकाका ध्यान हुआ । ऐसे ही स्तवन भी है, सुनो !

महादेवजीने कहा:

“जगन्माता भगवती मङ्गलचण्डिके ! आप सम्पूर्ण विपत्तियोंका विध्वंस करनेवाली हो एवं हर्ष तथा मङ्गल प्रदान करनेको सदा प्रस्तुत रहती हो । मेरी रक्षा करो, रक्षा करो । खुले हाथ हर्ष और मङ्गल देनेवाली हर्ष मङ्गलचण्डिके ! आप शुभा, मङ्गलदक्षा, शुभमङ्गलचण्डिका, मङ्गला, मङ्गलार्हा तथा सर्वमङ्गलमङ्गला कहलाती हो ।

देवि ! साधुपुरुषोंको मङ्गल प्रदान करना तुम्हारा स्वाभाविक गुण हैं । तुम सबके लिये मङ्गलका आश्रय हो । देवि ! तुम मङ्गलग्रहकी इष्टदेवी हो । मङ्गलके दिन तुम्हारी पूजा होनी चाहिये । मनुवंशमें उत्पन्न राजा मङ्गलकी पूजनीया देवी यहो । मङ्गलाधिष्ठात्री देवी !

तुम मङ्गलोंके लिये भी मङ्गल हो । जगत्के समस्त मङ्गल तुमपर आश्रित हैं । तुम सबको मोक्षमय मङ्गल प्रदान करती हो । मङ्गलको सुपूजित होनेपर मङ्गलमय सुख प्रदान करनेवाली देवि ! तुम संसारकी सारभूता मङ्गलाधारा तथा समस्त कर्मोंसे परे हो ।”

इस स्तोत्रसे स्तुति करके भगवान् शंकरने देवी मङ्गचण्डिकाकी उपासना की । वे प्रति मङ्गलवारको उनका पूजन करते चले जाते हैं । यों ये भगवती सर्वमङ्गला सर्वप्रथम भगवान् शंकरसे पूजित हुई ।

उनके दूसरे उपासक मङ्गल ग्रह हैं । तीसरी बार राजा मङ्गलने तथा चौथी बार मङ्गलके दिन कुछ सुन्दरी स्त्रियोंने इन देवीकी पूजा की । पाँचवीं बार मङ्गलकी कामना रखनेवाले बहुसंख्यक मनुष्योंने मङ्गलचण्डिकाका पूजन किया । फिर तो विश्वेश शंकरसे सुपूजित ये देवी प्रत्येक विश्र्वमें सदा पूजित होने लगीं । मुने ! इसके बाद देवता, मुनि, मनु और मानव सभी सर्वत्र इन परमेश्र्वरीकी पूजा करने लगे ।

फलश्रुति:

जो पुरुष मनको एकाग्र करके भगवती मङ्गलचण्डिकाके इस स्तोत्रका श्रवण करता है, उसे सदा मङ्गल प्राप्त होता है । अमङ्गल उसके पास नहीं आ सकता । उसके पुत्र और पौत्रोंमें वृद्धि होती है तथा उसे प्रतिदिन मङ्गलही दृष्टिगोचर होता है ।

यह हिंदी अनुवाद गीताप्रेस गोरखपुर द्वारा प्रकाशित संक्षिप्त ब्रह्मवैवर्तपुराणमे किये गये हिंदी अनुवादपर आधारित है तथा उनके प्रति नम्रतापूर्वक कृतज्ञता प्रगतकरते हुए साधकोंके लिये सादर किया गया है ।
Mangala chandika stotram

वेंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी Venkatesh Stotra येथे क्लिक करा.
अन्नपूर्णा स्तोत्र वाचण्यासाठी Annapurna Stotra येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link