Kanakadhara Stotra | श्री कनकधारा स्तोत्र

कनकधारा स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण स्तोत्र आहे, ज्याची रचना आदि शंकराचार्य यांनी केली आहे. हे स्तोत्र देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. आता आपण या स्तोत्राच्या विविध पैलूंवर चर्चा करूया.

आदि शंकराचार्य हे 8व्या शतकातील एक महान भारतीय तत्त्वज्ञ आणि धर्मसुधारक होते. त्यांनी अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यांच्या कार्यामुळे हिंदू धर्माला एक नवीन दिशा मिळाली.

कनकधारा स्तोत्रात देवी लक्ष्मीच्या विविध गुणांची स्तुती केली आहे. उदाहरणार्थ, पहिला श्लोक असा आहे:

अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती
भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्।
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला
माङ्गल्यदास्तु मम मङ्गळदेवतायाः॥

या श्लोकात, देवी लक्ष्मीची तुलना भृंग (मधमाशी) शी केली आहे, जी तमाल वृक्षाच्या फुलांवर बसते. देवी लक्ष्मीच्या कृपादृष्टीने सर्व संपत्ती प्राप्त होते, असे येथे सांगितले आहे.

कनकधारा स्तोत्राची उत्पत्ती

एकदा आद्यशंकराचार्य भिक्षेनिमित्ताने एका गरीब ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन ‘भिक्षां देही’चा पुकारा करतात. त्या घरात भिक्षेसाठी अन्नाचा कणही नसतो. ती ब्राह्मण स्त्री घरातला एक सुकलेला आवळा त्यांच्या झोळीत घालते. तिची दैन्यावस्था बघून शंकराचार्यांना करुणेचा पाझर फुटतो आणि ते अत्यंत करुणामय अंत:करणाने श्रीमहालक्ष्मीचा धावा करतात व त्या कुटुंबाचे अठराविश्वे दारिद्र्य दूर व्हावे अशी प्रार्थना करतात. स्तोत्राच्या प्रभावाने, शंकराचार्यांच्या सकारात्मक शब्दप्रभावाने आकाशातून सुवर्णमयी आवळ्यांचा वर्षाव होतो व त्या स्त्रीच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर होते, अशी आख्यायिका आहे.

कनकधारा स्तोत्राचे फायदे

हे स्तोत्र देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. असे मानले जाते की, या स्तोत्राच्या पठणाने आर्थिक समृद्धी आणि सुख-शांती प्राप्त होते.

या स्तोत्राच्या नियमित पठणाने आर्थिक समृद्धी, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते, असे मानले जाते. अनेक भक्तांनी या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवले आहेत.

हे स्तोत्र केवळ आर्थिक समृद्धीसाठीच नव्हे, तर आत्म्याच्या उन्नतीसाठीही महत्त्वपूर्ण आहे. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून, साधक आपल्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ शकतो.

READ  Shree Ram Raksha Stotra | श्री राम रक्षा स्तोत्र

श्री कनकधारा स्तोत्र (संस्कृत)

॥ श्री कनकधारा स्तोत्र ॥

अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती
भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्।
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला
माङ्गल्यदास्तु मम मङ्गळदेवतायाः॥ १॥

मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि।
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले या
सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः॥ २॥

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दं
आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम्।
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः॥ ३॥

बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे या
हारावलीव हरिनीलमयी विभाति।
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयायाः॥ ४॥

कालाम्बुदाळिललितोरसि कैटभारेः
धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव।
मातुस्समस्तजगतां महनीयमूर्तिः
भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः॥ ५॥

प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावान्-
माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन।
मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं
मन्दालसं च मकरालयकन्यकायाः॥ ६॥

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षं
आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि।
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध-
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः॥ ७॥

इष्टा विशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र
दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते।
दृष्टिः प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टरायाः॥ ८॥

दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधारां
अस्मिन्नकिञ्चनविहङ्गशिशौ विषण्णे।
दुष्कर्मघर्ममपनीय चिराय दूरं
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाहः॥ ९॥

गीर्देवतेति गरुडध्वजभामिनीति
शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति।
सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै॥ १०॥

श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै
रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै।
शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै
पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै॥ ११॥

नमोऽस्तु नालीकनिभाननायै
नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै॥ १२॥

नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै
नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै।
नमोऽस्तु देवादिदयापरायै
नमोऽस्तु शार्ङ्गायुधवल्लभायै॥ १३॥

नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै
नमोऽस्तु विष्णोरुरसि स्थितायै।
नमोऽस्तु लक्ष्म्यै कमलालयायै
नमोऽस्तु दामोदरवल्लभायै॥ १४॥

नमोऽस्तु कान्त्यै कमलेक्षणायै
नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै।
नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै
नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै॥ १५॥

सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि
साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि।
त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि
मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये॥ १६॥

यत्कटाक्षसमुपासनाविधिः
सेवकस्य सकलार्थसम्पदः।
सन्तनोति वचनाङ्गमानसैः
त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे॥ १७॥

सरसिजनिलये सरोजहस्ते
धवळतमांशुकगन्धमाल्यशोभे।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे
त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्॥ १८॥

दिग्घस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट
स्वर्वाहिनी विमलचारुजलप्लुताङ्गीम्।
प्रातर्नमामि जगतां जननीमशेष
लोकाधिनाथगृहिणीममृताब्धिपुत्रीम्॥ १९॥

कमले कमलाक्षवल्लभे त्वं
करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः।
अवलोकय मामकिञ्चनानां
प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः॥ २०॥

देवि प्रसीद जगदीश्वरि लोकमातः
कल्यानगात्रि कमलेक्षणजीवनाथे।
दारिद्र्यभीतिहृदयं शरणागतं मां
आलोकय प्रतिदिनं सदयैरपाङ्गैः॥ २१॥

स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं
त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।
गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो
भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः॥ २२॥

READ  Shri Kalbhairav Stotra | श्री कालभैरव स्तोत्र

॥ इति श्रीमद् शङ्कराचार्यकृत श्री कनकधारास्तोत्रं सम्पूर्णम्॥

(PDF) Download श्री हनुमान वडवानल स्तोत्र

Kanakadhara Stotram | कनकधारा स्तोत्रम् | Lakshmi Stotram | Madhvi Madhukar Jha
श्री कनकधारा स्तोत्र (संस्कृत)

प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचण्यासाठी Pradnya Vivardhan Stotra येथे क्लिक करा.

कनकधारा स्तोत्राचा मराठी अनुवाद

उमलत्या कळ्यांनी तमाल अलंकृत। जैसे भ्रमरी तेथे होते आश्रित॥
श्रीहरी रोमांच आभूषणांनी पुलकित। तेथे लक्ष्मी कटाक्षलीला तद्वत नित्य वर्षत॥
मंगलाधिष्ठित लक्ष्मीची ती कटाक्षलीला। तद्वतच राहो मजवरी नित्यमंगला॥१॥

गुंजारव विकसित कमलावरी भ्रमराचे। क्षीरकन्या अवलोकित मुखकमल मुरारीचे॥
असावा तोची कटाक्ष लज्जायुक्त। प्राप्त होण्या मज धनवैभव नित्य॥२॥

श्रीहरी देई शोभासामर्थ्य देवाधिपतीस। लक्ष्मी देई आनंद त्या मुररिपू श्रीहरीस॥
त्याच अत्यानंदी नयन कटाक्षाने। तू क्षणिक पहावे मजकडे कृपादृष्टीने॥३॥

आनंदकंद मुकुंद निद्रिस्त शेषावर। अनिमेश लक्ष्मी लुब्ध त्या सौंदर्यावर॥
तेच आनंदविभोर अर्धोन्मीलित नयन। करोत मला ऐश्वर्य संपन्न॥४॥

मधू दैत्याच्या वध करी। तो नीलकौस्तुभ विभूषित श्रीहरी॥
वक्षी शोभतसे इंद्रनिलमयी हारावली। हृदयी त्या निर्मिते प्रेम कमलनिवासिनी॥
त्याच कलमनिवासिनीची कटाक्षमला। सदोदित कल्याणकारी असावी मजला॥५॥

तेजपुंज घननील कैटभारीवक्षी विराजे। श्री लक्ष्मी विद्द्युल्तेपरी तेथेची साजे॥
भार्गवकन्या विश्वमाता परमपूजनीय मूर्ती। करो सदोदित माझ्या कल्याणाची पूर्ती॥६॥

सागर कन्या लक्ष्मीचा मंदालस। अर्धोन्मीलित दृष्टीप्रभाव आहेच खास॥
मधूमर्दनकारी श्रीहरी मांगल्याधिष्ट। त्या हृदयी प्रथमच मदन समाविष्ट॥
त्या लक्ष्मीचीच मृदू, सोम्य, दृष्टी ।करो मजवर हमेशा दयाद्रकृपा वृष्टी॥७॥

हे लक्ष्मी हरीप्रणयिनी तुझी दया। असे अनुकूल पवन रूपी माया॥
मायेने कर हा दुष्कर्मी उन्हाळा दूर। त्यात दारिद्र्याने विषादग्रस्ताची भर॥
कृपेसाठी आर्त मी चातकशिशु सहान। तू मेघ वर्षावे धनरूपी जलधारा समान॥८॥

तुझी दयार्द्र दृष्टी देण्या स्वर्गपद सक्षम।असो इष्ट भक्त कोणी मंद वा अकार्यक्षम॥
तुझी कृपादृष्टी कमळांतरगत कोमलते समान।हे पद्मासना देवी आता करी समृद्धी महान॥९॥

महालक्ष्मी तू वाग्देवता सृष्टीउत्पन्न काळी।तूच वैष्णवीशक्ती पालन क्रीडेचे वेळी॥
तू पत्नी सुंदर गरुडध्वज भगवान विष्णूंची।शाकंबरी प्रलयकाळी चंद्रशेखर शंकराची॥
त्रिभुवन गुरु भगवान नारायण। त्यांच्या समवेतच तू विराजमान॥
त्यांच्या नित्ययौवना कोमलांगी प्रेमिकेला। नमस्कार माझा त्या श्री लक्ष्मीला॥१०॥

READ  Shri Mangal Chandika Stotra | श्री मंगल चंडिका स्तोत्र

नमस्कार त्या लक्ष्मीस। रमणीयगुण महासागरास॥
जी देते शुभ कर्माचे फल उत्तम। वेदविद्या स्वरूप अशी ती सर्वोत्तम॥
नमस्कार रतीरुपस्थित शुद्धप्रेमानंद मातेस। कमलसदनात असे जीचा नित्य निवास॥
नमस्कार नानाविधीशक्ती रूपअधिष्ठित मातेस। पुरुषोत्तमाच्या प्राणप्रिय पत्नीस॥
नमस्कार सर्वसमृद्धीस्वरुप विद्यमान मातेस। कमलकांती आरक्तवर्ण मुखप्रभा लक्ष्मीस॥११॥

नमस्कार क्षीरसागर सम्भूता सोम, सुधा भगिनीस। नमस्कार नारायणाच्या प्रियअर्धांगिनीस॥१२॥

पूज्य कमलाक्षी वंदने तुझ्या चरणीची। नांदीच साम्राज्यसंपत्ती, इंद्रीयानंदाची॥
जडो छंद वंदनाचा तुझे मंगलचरण। मिळेल मोक्ष वैभव होते पापहरण॥१३॥

लाभे कृपाकटाक्ष विधीपूर्वक उपासनेला। प्रसन्नता तुझी देते पूर्णत्व मनोरथाला॥
त्या श्रीहरी हृदयेश्वरीचे गुण मी गातो। श्री लक्ष्मीला मी अनन्यतेने भजतो॥१४॥

कमल निवासिनी हरिप्रिय कांते। धवलवस्त्र, गंधमाला तुला शोभते॥
हे देवी लक्ष्मी कमलधारिणी सौंदर्यवती। वैभव प्रदायिनी प्रसन्न हो मजवरती॥१५॥

जलनिर्मळ स्वर्गगंगेचे स्वर्ण कलशात धरुनी। दिग्गज करिती अभिषेक तुजवरती नित्य दिनी॥
सागर कन्या जी विश्वाधीपती श्रीहरीची गृहिणी। तिला प्रात:काळी मी वंदितो प्रतिदिनी॥१६॥

देवी श्रीलक्ष्मी पुंडरीकनयन श्रीहरीची प्रियकांता।तू महापूर करुणेचा मी अग्रगण्य दरिद्री आता॥
मी गरीब तुझ्या दयेला योग्य आहे।तू मज कडे आता कृपा दृष्टीने पाहे॥१७॥

जे नित्य पठिती हे स्तोत्र भगवती श्री लक्ष्मीचे।वेदत्रयी स्वरूपा त्रिभुवन माता वाढवी ऐश्वर्य तयांचे॥
पावती श्रेष्ठता सद्गुणे होती भाग्यवान।विद्वानांतहि मिळेल त्यांना मोठा मान॥१८॥

मराठी अनुवाद स्रोत: मायबोली

कनकधारा स्तोत्र मराठी भाषेत / Kanakdhara Stotra Marathi | कनकधारा स्तोत्रम् | Lakshmi Stotram
श्री कनकधारा स्तोत्र (मराठी)

घोरकष्टोद्धरण स्तोत्र वाचण्यासाठी Ghorkashtodharan Stotra येथे क्लिक करा.
श्री हनुमान वडवानल स्तोत्र वाचण्यासाठी Shri Hanuman Vadvanal Stotra येथे क्लिक करा.
दारिद्र्य दहन शिव स्तोत्र वाचण्यासाठी Daridra Dahan Shiv Stotra येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment

Share via
Copy link